सौरवने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, सकाळी व्यायाम केल्यानंतरचा फोटो पोस्ट केला होता.
साहजिकच त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. मात्र सौरवचा जुना साथीदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिनने या फोटोवर खुद्द दादाशी पंगा घेत त्याला ट्रोल केलं आहे. पाहा सचिन आणि सौरवमध्ये रंगलेला हा गमतीशीर संवाद…
सौरव गांगुलीच्या पुढाकारामुळे भारतीय संघाने २०१९ साली आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. त्यामुळे आगामी काळात सौरवच्या नेतृत्वाखाली BCCI मध्ये नेमके काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.