Gudipadwa 2026 Sachin Tendulkar Celebration Video: आज १९ मार्च सगळीकडे गुढीपाडव्याचा सण थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वच जण एकमेकांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. अनेक ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान अनेक क्रिकेटपटूंनीही चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठमोळ्या सचिन तेंडुलकरने गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारत व्हीडिओ शेअर केला आहे.

भारताचा मराठमोळा खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या राहत्या घरी गुढी उभारत हा सण साजरा केला आहे. सचिनने पत्नी अंजलीसह गुढी उभारली आणि यादरम्यान त्याची आईदेखील उपस्थित होती. सचिनने गुढी उभारल्यानंतर सहपत्नी आईचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांना पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडुलकरच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं

सचिन तेंडुलकरने या व्हीडिओमध्ये बोलताना दिसत आहे, “नवीन वर्ष सुरू होतंय पाडव्याला तर गुढी उभारल्यानंतर पाया पडूया.” यानंतर सचिन व अंजली आईच्या पाया पडले आणि यादरम्यान त्यांचा लाडका कुत्रादेखील तिथे होता. त्याला बोलावून सचिनने खाऊ दिला. यानंतर व्हीडिओचा शेवट करताना त्याने नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या रीलमध्ये सर्वांनी सचिनला शुभेच्छा देत त्याचं कौतुकही केलं.

भारताचे संस्कार दाखवत सणाच्या निमित्ताने मोठ्यांचे आशिर्वाद घेतले जातात आणि सचिनने व त्याच्या पत्नीने एकत्र जोड्याने त्याच्या आईचे आशीर्वाद घेतले. हा क्षण पाहून चाहत्यांनी सचिन तेंडुलकरचं व त्याच्या पत्नीचंदेखील कौतुक केलं आहे. यादरम्यान सचिन व कुटुंबाने छान ट्रेडिशनल कपडे परिधान केले होते. सचिनने पिवळ्या रंगाचा कुर्ता तर पत्नी अंजलीने केशरी रंगाचा कुर्ता घातला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घराच्या दाराला फुलांचं छान तोरण बांधलं आहे. गुढीभोवती फुलांची रांगोळी काढली आहे. तर दरवाज्यातदेखील रांगोळी काढलेली दिसत आहे. अगदी छान मराठमोळ्या पद्धतीने सचिनने हा सण साजरा केला आहे.

या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये सचिनने मराठीत शुभेच्छा देत लिहिलं, “तुम्हाला व कुटुबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृध्दीचे जावो, हीच प्रार्थना करतो.” काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरचा धाकटा लेक अर्जुनचं लग्न झालं. पण आयपीएल २०२६ करता अर्जुन तेंडुलकर संघात सामील झाला आहे. तर त्याची पत्नी सानिया चंडोकदेखील त्याच्यासोबत आहे. संघात सामील होण्यापूर्वी एअरपोर्टवरील दोघांचा व्हीडिओ पाहायला मिळाला होता. अर्जुन व सानिया चंडोकचं लग्नदेखील अगदी राजेशाही थाटात आणि मराठमोळ्या परंपरेनुसार पार पडलं.