Sachin Tendulkar on son Arjun Wedding: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा २०२६पासून सुरू आहेत. अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकबरोबर लग्न करणार आहे आणि त्यांच्या लग्नाची तारीखही रिपोर्ट्समध्ये समोर आली होती. अर्जुन व सानिया यांनी २०२५ मध्ये खाजगी समारंभात साखरपुडा उरकला होता. या लग्नाच्या चर्चांदरम्यान आता सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत लग्न होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कमोर्तब केला आहे.
अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. दोन्ही कुटुंबीय व जवळचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. तेंडुलकर व चंडोक कुटुंबियांनी गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर आता २०२६ मध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. यासाठी तेंडुलकर व चंडोक परिवार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित करण्यासाठी गेले होते.
रिपोर्ट्सनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वीचे विधी ३ मार्चपासून सुरू होतील. तर ४ मार्चला होळीचा सण देखील असणार आहे, त्यामुळे सणादरम्यान लग्नसोहळा असल्याने जोरदार सेलिब्रेशन होईल. या लग्नसोहळ्याला भारतातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकरसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तेंडुलकर व चंडोक कुटुंब उपस्थित होतं. सचिन पत्नी अंजली तेंडुलकर, लेक सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर याचबरोबर सानिया चंडोक व तिचे आईबाबाही उपस्थित होते.यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अर्जुन व सानियाबरोबर फोटोही काढला आणि त्यांना लग्नाच्या शुभेच्छादेखील दिल्या. सचिनच्या या पोस्टमुळे अर्जुन व सानियाच्या लग्नाच्या रिपोर्ट्सना दुजोरा मिळाला असून सर्वांच्या नजरा आता या लग्नसोहळ्यावर असतील.
सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया पेट केअर ब्रँडची मालकिणदेखील आहे आणि ती तेंडुलकर कुटुंबाला खूप काळापासून ओळखते. सानिया ही सारा तेंडुलकर व अर्जुनची बालपणीची मैत्रिणदेखील आहे. सारा अनेकदा सानिया चंडोकबरोबर फोटो शेअर करत असते. इतकंच नव्हे तर तेंडुलकर कुटुंबांच्या कार्यक्रमांना व सहलींना देखील सानिया दिसली आहे. साराच्या पिलाटेस अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यालादेखील ती उपस्थित होती.

