Sachin Tendulkar Life Sized Statue At Wankhede: सचिन तेंडुलकरने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे जिथे पादाक्रांत केली अशा वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटच्या देवाचा एक भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे. क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 एप्रिलला, तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाला किंवा वर्षाच्या अखेरीस ५० षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आज, वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे, पुतळा कुठे ठेवायचा हे पाहण्यासाठी पोहोचले होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “वानखेडे स्टेडियममधील हा पहिला पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे लवकरच ठरवू. तेंडुलकर भारतरत्न आहे आणि त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या ५०व्या वाढदिवशी हे MCA कडून एक लहान गिफ्ट असेल. तीन आठवड्यांपूर्वीच सचिनने यासाठी परवानगी दिली आहे.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श
IPL 2024 : सर्वांच्या सहमतीनेच निर्णय! सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून हार्दिकची पोलार्डकडून पाठराखण

वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेले स्टँड आहे. एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टँड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होत. देशात क्रिकेटपटूंचे पुतळे स्टेडियममध्ये नाहीत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताचे माजी महान फलंदाज सी के नायडू यांचे असे तीन स्वतंत्र पुतळे आहेत.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दिवंगत शेन वॉर्नचा क्रिकेटपटूंचा सर्वात प्रसिद्ध पुतळा आहे. २०११ मध्ये वॉर्नने अनावरण करताना म्हटले होते, “हा एक मोठा सन्मान आहे, स्वतःला तिथे पाहणे थोडे विचित्र आहे पण मला खूप अभिमान आहे.” हा पुतळा 300 किलोचा आहे! आता भारतातही सचिन तेंडुलकरसाठी असाच भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येत आहे.

सचिनने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (१००) आणि (३४,३५७) धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.