Premium

Varanasi: सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ लिहिलेली टीम इंडियाची खास जर्सी दिली भेट, पाहा VIDEO

Varanasi Stadium foundation ceremony: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक सुंदर भेट दिली आहे. सचिन तेंडुलकरने मोदींना नमो लिहलेली टीम इंडियाची जर्सी दिली.

Varanasi Stadium foundation ceremony
सचिन तेंडुलकरने नमो नाव असलेली टीम इंडियाची जर्सी मोदींना दिली (फोटो-एनएआय)

Sachin Tendulkar Gives Team India Jersey To Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २३ सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये भगवान शिव-थीम असलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. १२१ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमसाठी सुमारे ३३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या या पायाभरणीच्या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींना दिली खास जर्सी –

वाराणसीमध्ये आयोजित या मोठ्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ, पीएम मोदी, सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर क्रिकेटपटू मंचावर उपस्थित होते. त्यानंतर सचिने तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली. या जर्सीच्या समोरील बाजूवर टीम इंडिया लिहिलेले आहे, तर मागे ‘नमो’ असे नाव लिहले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुनील गावस्कर आणि कपिल देवही उपस्थित होते.

२०२५ पर्यंत स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची शक्यता –

या स्टेडियमची आसन क्षमता अंदाजे ३०,००० असेल आणि त्यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण, त्रिशूळाच्या आकाराचे फ्लडलाइट्स आणि वेलीची पाने आणि डमरू सारख्या रचना यासारखे अद्वितीय डिझाइन घटक असतील. स्टेडियमच्या डिझाइनचा उद्देश काशीचे सार टिपणे आहे. प्रेक्षक गॅलरी हे वाराणसीच्या घाटांच्या पायऱ्यांसारखे दिसते. हे स्टेडियम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir: गंभीरने नवीन उल हकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताच विराट कोहलीचे चाहते संतापले, जाणून घ्या कारण

हे देशातील ५४वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. आत्तापर्यंत भारतात ५३ वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश स्टेडियम आता बंद झाले असून काहींचे नूतनीकरण सुरू आहे. वाराणसीच्या गंजरी येथे हे स्टेडियम ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे.

स्टेडियमच्या पायाभरणी व्यतिरिक्त, पीएम मोदींनी वाराणसीमध्ये महिला समर्थकांच्या रॅलीला संबोधित केले. त्याचबरोबर संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह उपस्थित होते. कानपूर आणि लखनौनंतर उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar presents team india jersey named namo to pm narendra modi stadium foundation ceremony in varanasi vbm

First published on: 23-09-2023 at 16:36 IST
Next Story
Asian Games Opening Ceremony: आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात! कुठे पाहायला मिळणार उद्घाटन सोहळा? जाणून घ्या