scorecardresearch

Premium

दारू, जुगार आणि तंबाखूचं सचिन तेंडुलकर करतोय समर्थन? वाचा काय म्हणाला क्रिकेटचा देव

सचिन तेंडुलकर एका जाहिरातीप्रकरणी चर्चेत आला आहे.

Sachin Tendulkar says casino used his morphed images to take legal action
सचिन तेंडुलकर (संग्रहीत छायाचित्र)

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या खोट्या जाहिरातींमुळे हैराण झाला आहे. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो कॅसिनोची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनने या प्रकरणावर म्हटले की, मी अशा गोष्टींना कधीही दुजोरा दिला नाही आणि या जाहिराती खोट्या आहेत. सचिन आता अशा लोकांवर कायदेशीर कारवाईही करणार आहे.

कसिनोच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना सचिनने म्हटले, ”माझ्या लक्षात आले आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फिंगद्वारे कसिनोची जाहिरात करताना दाखवण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या दारू, जुगार किंवा तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही, परंतु माझ्या फोटोंचा गैरवापर दुःखदायक आहे.”

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान

हेही वाचा – IPL 2022 : अरे बापरे..! चेन्नई सुपर किंग्जसाठी धोक्याचा इशारा; आता काय करणार धोनी?

सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचा विक्रम आतापर्यंत एकाही फलंदाजाला मोडता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ आणि कसोटीत ५१ शतके झळकावली आहेत. २०१९ मध्ये, सचिनला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. हा बहुमान मिळवणारा तो सहावा भारतीय खेळाडू आहे. क्रिकेट विश्वातील अभूतपूर्व योगदानासाठी सचिनला भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

सचिनने दोन दशके जागतिक क्रिकेटवर राज्य केले. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. या प्रकरणात श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने जवळपास २८ हजार धावा केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-02-2022 at 16:21 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×