करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगात दहशतीचे वातावरण आहे. अनेकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाच्या काळात सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द खूप परिचयाचा झाला आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करण्यात येत आहे, पण नुकत्याच एक कार्यक्रमात सचिनने सोशल डिस्टन्सिंग बद्दल एक आठवण सांगितली. क्रीडाक्षेत्राशी संबंधित एका वाहिनीच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना सचिनने एकेकाळी ‘सोशल डिस्टन्सिंग’ खड्ड्यात गेलं असं वाटलं असल्याचं सांगितलं.

“आक्रमक गांगुली आणि शांत धोनी यांच्यात एक साम्य होतं”

भारताचा मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकर याने १९९८ साली शारजा च्या मैदानावर केलेली खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. सचिनने त्या मैदानावर ३ दिवसात २ शतके ठोकली होती. सचिन नावाच्या वादळाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा पार धुव्वा उडवला होता. पण त्यावेळी शारजाच्या मैदानावर खरोखर एक वादळ आलं होतं. सचिनसाठी अशाप्रकारचे वादळ येणं हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे सचिनला नक्की काय करावंसं वाटलं त्याबद्दल सचिनने सांगितलं.

“धोनीलाच क्रिकेटपासून दूर राहायचं होतं”; माजी निवडकर्त्यांचे स्पष्टीकरण

“अशाप्रकारे वाळवंटात वाळूचे वादळ पाहण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी असं आधी कधीच पाहिलं नव्हतं. सर्वप्रथम जेव्हा मी वादळ पाहिलं, तेव्हा मला वाटलं की आता मी उडून जाणार. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक गिलक्रिस्ट माझ्या मागे उभा होता. वादळ इतकं वेगवान आणि जोरदार होतं की मी असा विचार केलाच होता की सोशल डिस्टन्सिंग वैगेरे खड्ड्यात गेलं आणि मी गिलक्रिस्टला पकडण्याच्या तयारीत होतो. वादळाचा वेग वाढला तर मी आणि गिलक्रिस्ट दोघे मिळून किमान ८०-९० किलोचे वजन तरी होईल असा माझा विचार होता, पण तितक्यात पंचांनी मैदान सोडून सगळ्यांना आतमध्ये जायला सांगितलं”, अशी भन्नाट आठवण सचिनने सांगितली.

दरम्यान, सचिनने त्या सामन्यात शतक ठोकले. त्याच्या शतकाने केवळ भारत जिंकलाच नाही, तर भारताला चांगल्या धावगतीच्या आधारवर अंतिम फेरीत स्थानदेखील मिळाले.