‘God Of Cricket’ Sachin Ramesh Tendulkar : वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा सचिन बघता बघता क्रिकेटचा देवच झाला. मैदानात उतरल्यानंतर गोलंदाजांवर सचिनने चौफेर फटकेबाजी केली नाही, असे सामने हातावर बोटे मोजण्या इतके असतील. सचिनने अप्रतिम फलंदाजी करत क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक ठोकणाऱ्या सचिनचा विक्रम आजतागायत कोणत्याही खेळाडूने मोडला नाही. म्हणून आजही क्रिकेटच्या मैदानात सचिन…सचिनचा नारा लगावला जातो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर आयपीएलमध्येही सचिन तेंडुलकरने धडाकेबाज फलंदाजीची छाप टाकली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीजनमध्ये सचिनने ऑरेंज कॅप जिंकून सिद्ध करून दाखवलं होतं की, त्याला क्रिकेटचा देव का म्हणतात. सचिन सलग ६ वर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळला. आयपीएलच्या पहिल्या दोन सीजनमध्ये सचिनने चमकदार कामगिरी केली नव्हती. त्यावेळी सचिनच्या टी-२० क्रिकेटच्या कारकीर्दीबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. त्यानंतर २०१० मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अप्रतिम फलंदाजी करून सर्वांच्या भुवया उंचावल्या. सचिनने या आयपीएलमध्ये १५ सामन्यात ४७.५३ च्या सरासरीनं ६१८ धावा केल्या. त्यामुळे सचिनला आयपीएलच्या ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात आलं.

Who is Gus Atkinson He Took 12 Wickets in Test Debut
कसोटी पदार्पणात १२ विकेट घेणारा इंग्लंडचा Gus Atkinson आहे तरी कोण? पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम
Shubman Gill reaction to India win
IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…”
Zimbabwe beat India by 13 runs,
IND vs ZIM 1st T20 : निराशाजनक पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? कोणाला धरले जबाबदार? जाणून घ्या
pm narendra modi meets team india
Video: “मैदानावरच्या मातीची चव कशी होती रोहित?” पंतप्रधान मोदींचा हिटमॅनला प्रश्न; विराटला म्हणाले, “फायनलमध्ये जाताना…”
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Sourav Ganguly Statement on Virat Kohli Form in T20 World Cup 2024
“विराटबद्दल तर बोलूच नका…”, वर्ल्डकपमध्ये फॉर्मात नसलेल्या कोहलीवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य, म्हणाले; “३-४ सामने”
Rahul Dravid Makes Bold Prediction About Virat Kohli
IND vs SA T20 WC Finals: विराट कोहलीच्या भूमिकेबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, “काही मोठे बदल..”
IND vs ENG Rohit Sharma Press Conference
IND vs ENG: रोहित शर्माच्या मनात एकच चिंता; T20 WC सेमीफायनलआधी स्वतः म्हणाला, “सामना उशिरापर्यंत चालला तर..”

नक्की वाचा – Video: WPL मध्ये इस्सी वोंगने रचला इतिहास; फलंदाजांच्या केल्या दांड्या गुल, पाहा विकेट हॅट्रिकचा व्हिडीओ

याचसोबत सचिनने २०१० च्या आयपीएल दरम्यान ५ वेळा पन्नासहून अधिक धावा कुटल्या. सचिनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात झालेल्या सामन्यात हाताला दुखापत झाली असतानाही सचिनने ४८ धावांची खेळी केली होती. पण त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही. तसंच सचिनने आयपीएलच्या चौथ्या सीजनमध्येही कमाल केली होती. आयपीएलच्या त्या सीजनमध्ये सचिनने ५५३ धावांचा डोंगर रचला होता.सचिनने ७८ सामन्यांत ३४. ८३ च्या सरासरीनं २३३४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सचिनने १ शतक आणि १३ अर्धशतक ठोकले होते. सचिनचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर नाबाद १०० आहे. २०१३ नंतर सचिन आयपीएलमधून निवृत्त झाला.