सरस छे..! पत्नी अंजलीला सचिननकडून ‘गुजराती’ ट्रीट; फोटो शेअर करत सांगितला मजेशीर किस्सा!

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

Sachin_Tendulkar
(Photo- Sachin Tendulkar Instagram)

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीचा वाढदिवस गुजराती रेस्टॉरंटमध्ये साजरा केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंजली तेंडुलकर यांचा १० नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो. वाढदिवसाचं औचित्य साधत कुटुंबियांसोबत सचिनने गुजराती रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा बेत आखला होता. सचिन फोटो शेअर करताना त्यावेळेचा मजेशीर किस्सा सांगण्यास विसरत नाही.

“अंजलीचा वाढदिवस श्री ठक्कर भोजानलयामधली सरस थाळी खाऊन साजरा केला. तिचे गुजराती जीन्स स्ट्राँग आहेत. पण आमच्या जीन्सची बटण जेवण झाल्यानंतर वीक झालीत. तसेच हे रेस्टॉरंट १९४५ पासून सुरु आहे, हे जाणून आश्चर्य वाटलं”, अशी कॅप्शन सचिन तेंडुलकरने लिहिली आहे. हा फोटो सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टनंतर सचिनचे चाहते त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सचिन आणि अंजली २४ मे १९९५ रोजी लग्न बंधनात अडकले होते. या दोघांना सारा आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत. सचिन तेंडुलकर आणि अंजली मेहता यांची लव्ह स्टोरी १९९० साली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु झाली. सचिन त्यावेळी पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरुन परतत होता तर अंजली आईला आणण्यासाठी विमानतळावर आली होती. त्यानंतर एका कॉमन मित्राच्या घरी दोघांची भेट झाली. सुरुवातीला अंजली मेहता आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली, त्यावेळी सचिन तेंडुलकरबद्दल अंजली यांना फार काही माहित नव्हते. दोघांनी डेटिंग सुरु केल्यानंतर सचिन आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू असल्याचे अंजली यांना समजले. “आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा क्रिकेटबद्दल मला काहीच माहित नव्हते, हेच सचिनला माझ्यामध्ये आवडले असावे असे वाटते. सचिन कोण आहे हे सुद्धा मला माहित नव्हते” असे अंजली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. “आम्ही दोघं रोझा चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कोणी ओळखू नये म्हणून सचिनने दाढी लावली होती व चष्मा घातला होता. पण इंटरव्हल दरम्यान त्याचा चष्मा पडला व लोकांनी त्याला ओळखले. त्यानंतर सचिनभोवती एकच गर्दी जमा झाली होती”. अंजली यांनी हा किस्साही मुलाखतीमध्ये सांगितला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sachin tendulkar share photo after celebrate wife birthday gujrati restaurant rmt

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला