Sachin Tendulkar Post On Vinesh Phogat Disqualification: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ही यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार होती. तिने सुरूवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. पण अंतिम सामन्यापूर्वी अतिरिक्त १०० ग्रॅम वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले होते. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण देशाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, या कठीण काळात सर्वजण विनेशसोबत आहेत. याबाबत आता सचिन तेंडुलकरने अंपायर्स कॉल म्हणत पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 14: विनेश फोगटच्या सुनावणीबाबत मोठी अपडेट, क्रीडा कोर्टाने काय म्हटलं? विनेश फोगटने ऑलिम्पिकच्या या निर्णयाबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टात याचिका दाखल केली आणि यामध्ये तिने संयुक्त रौप्य पदक मिळावी अशी मागणी केली. या प्रकरणी भारताचे अपील CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) ने स्वीकारले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विनेश फोगटच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये विनेश फोगट निश्चितपणे रौप्य पदक जिंकण्यास पात्र असल्याचे त्याने म्हटले आहे. नियम पुन्हा पाहण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. हेही वाचा - Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट… सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लिहिले की, "अंपायर कॉल घेण्याची वेळ आहे! प्रत्येक खेळात नियम असतात आणि कदाचित कधी कधी त्यांचा पुनर्विचार केला जावा. विनेश फोगट अंतिम फेरीसाठी योग्य आणि चांगली कामगिरी करत पात्र ठरली होती. अंतिम सामन्यापूर्वी वजनाच्या आधारावर तिला अपात्र ठरवले जात आहे आणि तिच्याकडून रौप्य पदक हिसकावून घेणे हे तर्क आणि खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे." सचिन तेंडुलकर म्हणाला, "एखाद्या खेळाडूला कामगिरी सुधरवणाऱ्या औषधांच्या वापरासारख्या नैतिक उल्लंघनासाठी अपात्र ठरवण्यात आले असेल तर ते समजण्यासारखे आहे. अशावेळी कोणतेही पदक न देणे आणि शेवटच्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. " हेही वाचा - Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण सचिन तेंडुलकर म्हणाला, "एखाद्या खेळाडूला कामगिरी चांगली करणाऱ्या औषधांच्या वापरासारख्या नैतिक उल्लंघनासाठी अपात्र ठरवण्यात आले असेल तर ते समजण्यासारखे आहे. अशावेळी कोणतेही पदक न देणे आणि शेवटच्या स्थानावर ठेवणे योग्य आहे. पण विनेशने तिच्या अंतिम सामन्यापूर्वीच्या सर्व सामन्यांमध्ये प्रामाणिकपणे तिच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. ती नक्कीच रौप्यपदकाची हकदार आहे. " तो पुढे म्हणाला, "आपण सर्वच आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, परंतु विनेश पात्र असलेले ते रौप्यपदक तिला मिळावे अशी आशा आणि प्रार्थना केली पाहिजे." हेही वाचा - PR Sreejesh: पीआर श्रीजेश आता भारताच्या ‘या’ हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक, हॉकी इंडियाने केली मोठी घोषणा