‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन अनेक उपक्रमात दिसतो. तो खवय्या असून त्याला विविध पदार्थांची चव चाखायला आवडते. आपल्या सोशळ मीडियाच्या माध्यमातून सचिन अनेकदा खाण्याचे व्हिडिओ शेअर करतो, यावेळी त्याने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. यात तो मिसळ पावचा आनंद घेत आहे.

सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मिसळ पाव खात आहे. ”मिसळ पावची बातच वेगळी आहे. महाराष्ट्राची मिसळ पाव एक नंबर”, असे सचिनने मिसळ पावची चव चाखताना म्हटले. सचिन अनेकदा आपल्या स्वयंपाकघरात त्याच्या हाताची जादू दाखवत असतो. यापूर्वी सचिनने अनेकवेळा स्वयंपाकघरात आपला हात आजमावला होता. सचिन हा एक अस्सल खवय्या आहे, ज्याला चांगले खायला आणि खिलवायलाही आवडते. ”सचिन ना, तो एक नंबरचा खादाड आहे, नुसते बटाटेवडे खात असतो”, असे सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी एकदा म्हटले होते.

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
President Draupadi Murmu Standing While Giving Bharatratna Award To Lalkrishna Advani
लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”

हेही वाचा – ASHES : अर्रर्र..! इंग्लंडला बसले ४४० व्होल्टचे ‘दोन’ धक्के; आधी सामना गमावला आणि आता…

सचिनची कारकीर्द

सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३४ हजाराहून अधिक धावा केल्या. कसोटीत सचिनने ५१ शतकांसह १५९२१ तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या. दोन्ही स्वरूपात तो सर्वाधिक धावा करणारा आहे.