Sachin Tendulkar Latest Tweet : विविध क्षेत्रात यशाचं उंच शिखर गाठणाऱ्या महिलांचा आज महिला दिनानिमित्त विशेष गौरव केला जातो. जगभरातील महिलांचे वेगेवगळ्या क्षेत्रात विशेष योगदान लाभले आहे. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटीज ट्वीटच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ अशाप्रकारचं ट्वीट सचिनने केलं आहे. महिला दिनाचे औचित्य साधून सचिनने केलेलं हे ट्वीट लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सचिन तेंडुलकरने ट्वीट करत म्हटलंय, आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा असे मला नेहमी वाटते. तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे. ३० जूनला तुम्हीही ते खात्रीने अनुभवू शकता “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना…स्त्री सन्मान आणि स्त्रीत्वाचा बहुमान साजरा करण्यासाठी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मीती करण्यात आली असून ३० जून २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. सहा बहिणींच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे.

ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”

नक्की वाचा – चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये होणार मोठे बदल? सूर्या तळपणार? ‘असं’ असेल समीकरण

इथे पाहा सचिनची ट्वीटर पोस्ट

बहिणींमध्ये असलेलं प्रेम, ध्येय, जिद्द, तडजोड, दु:ख, स्वार्थ अशा अनेक गोष्टींचे पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. जिओ स्टुडिओजच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. माधुरी भोसले आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. स्त्रीचा तिच्या आयुष्याच्या बघण्याचा दृष्टीकोन, विविध कलागुणांनी संपन्न असलेलं तिचं व्यक्तिमत्व आणि तिच्यात असलेल्या वेगवेगळ्या छटा यावर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे.