scorecardresearch

वाईट बातमी! दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईतील राहत्या घरी निधन

शेवटच्या सामन्यात दोनही डावात ठोकली होती अर्धशतके

संग्रहित छायाचित्र
करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवणाऱ्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंचे निधन झाले आहे.

Coronavirus : क्रीडाविश्वावर शोककळा! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

भारताचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वयस्क क्रिकेटपटूंपैकी एक असलेले वॉल्टर डिसूजा यांचे शुक्रवारी आपल्या निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. रात्रीच्या झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डिसूजा यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. डिसूजा यांनी गुजरात आणि एसीसी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इंदूर येथे होळकर संघाविरुद्ध गुजरातकडून १९५०-५१ च्या सत्रात रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात त्यांनी दोनही डावात (अनुक्रमे ५० व ७७) अर्धशतके ठोकली होती.

Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! वडिलांपाठोपाठ मुलाचा करोनाने मृत्यू

२०१७ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात आणि शेष भारत यांच्यात इराणी चषक स्पर्धेचा सामना होणार होता. तो सामना पाहण्यासाठी डिसूजा यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा ते ९० वर्षांचे असूनही तेव्हा ते वेळेवर तेथे आले होते आणि त्यांनी खेळाडूंशी छान चर्चा केली होती. शुक्रवारी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sad news former gujarat off spinner walter dsouza passed away at age of 93 amid coronavirus lockdown covid 19 vjb

ताज्या बातम्या