Sahibzada Farhan Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ५० वा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना श्रीलंकेसाठी फार महत्वाचा नाही. कारण श्रीलंकेचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण पाकिस्तानसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकून पाकिस्तानकडे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. यादरम्या नेट रनरेटही महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करताना साहिबजादा फरहानने पाकिस्तानला दमदार सुरूवात करून दिली. यादरम्यान त्याने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
साहिबजादा फरहान हा या स्पर्धेत पाकिस्तानचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. डावाची सुरूवात करताना त्याने आपल्या संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. श्रीलंकेविरूद्ध सामना पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यातही त्याने दमदार सुरूवात करून दिली आहे. या सामन्यात ४० धावांचा पल्ला गाठताच त्याने टी-२० वर्ल्डकपमधील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या विक्रमात विराट कोहलीला मागे टाकलं आहे. साहिबजादा फरहान हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने ३५० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी होता. विराटने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत फलंदाजी करताना सर्वाधिक ३१९ धावा केल्या होत्या. या यादीत तिलकरत्ने दिलशान तिसऱया स्थानी आहे. त्याने २००९ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ३१७ धावा केल्या होत्या. तर बाबर आझमने २०२१ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ३०३ धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा आणखी एक दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने २०१० मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ३०२ धावा केल्या होत्या.
एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
साहिबजादा फरहान- ३८३* धावा (२०२६)
विराट कोहली- ३१९ धावा (२०१४)
तिलकरत्ने दिलशान- ३१७ धावा (२००९)
बाबर आझम – ३०३ धावा (२०२१)
महेला जयवर्धने- ३०२ धावा ( २०१०)
