Sai Sudarshan Hit Wicket: क्रिकेटमध्ये हिट विकेट होणं ही सामान्य बाब आहे. कितीतरी क्रिकेटपटू हिट विकेट होऊन बाद होतात. पण साई सुदर्शन या बाबतीत खूप जास्त अनलकी आहे. फलंदाज क्वचितच हिट विकेट होतात. पण साई सुदर्शन लागोपाठ दुसऱ्यांदा हिट विकेट झाला आहे. सलग दुसऱ्यांदा त्याने चौकार मारला आणि त्यानंतर त्याची बॅट स्टंपला जाऊन लागली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी चांगली हा जमली होती. पण नेमकं तेव्हाच तो हिट विकेट होऊन माघारी परतला. दरम्यान बॅट स्टंपला लागताच कर्णधार गिलने दिलेली रिॲक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना १३ वे षटक टाकण्यासाठी ब्रिजेश शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील पाचवा चेंडू त्याने ऑफ साईडच्या दिशेने फूल टॉस टाकला. हा चेंडू साई सुदर्शनने ऑफ साईडच्या दिशेने कट केला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने गेला. पण चेंडू बॅटला लागताच बॅट हातातून सुटली आणि स्टंपवर जाऊन पडली.
शुबमन गिलची रिॲक्शन व्हायरल
साई सुदर्शन अशाप्रकारे बाद होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी क्वालिफायर १ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध खेळताना देखील तो अशाच पद्धतीने बाद झाला होता. साई सुदर्शन बाद होताच गिल गुडघ्यांवर बसला. गिलला विश्वासच बसत नव्हता की, साई सुदर्शन पुन्हा त्याच पद्धतीने बाद झाला आहे.
साई सुदर्शनची करतो
गुजरातचा विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण राजस्थान रॉयल्सला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजाने मिळून राजस्थानचा डाव सांभाळला. वैभव सूर्यवंशीने ९६ धावा केल्या. तर जडेजाने नाबाद ४५ धावा केल्या. शेवटी डोनोवन फरेराने नाबाद ३८ धावा करत संघाची धावसंख्या २१४ धावांवर पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने १०४ धावा केल्या. तर साई सुदर्शनने ५८ धावा केल्या. गुजरात टायटन्सने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
