भारताची फुलराणी म्हणून ओळख मिळवलेल्या सायना नेहवालने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सायनाने सिंधूचा दोन सेटमध्ये पराभव केला. सायनाचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद ठरलं आहे. याआधी २००६, २००७ आणि २०१८ साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घालत सायनाने आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.

सायनाने सिंधूची झुंज सरळ दोन सेटमध्ये २१-१८, २१-१५ अशी मोडून काढली. सिंधूने याआधी २०११ आणि २०१३ साली राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. पुरुषांमध्ये सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करत राष्ट्रीय विजेतेपदांची हॅटट्रीक साजरी केली. सौरभने १७ वर्षीय लक्ष्यला २१-१८, २१-१३ च्या फरकाने हरवत आपलं तिसरं विजेतेपद मिळवलं.