भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्याविषयी केलेल्या टिप्पणीमुळे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ चांगलाच ट्रोल झाला होता. या टिप्पणीनंतर त्याने आपल्या या ट्वीटबद्दल सायनाची माफीदेखील मागितली आहे. आपला विनोद लोकांच्या लक्षात न आल्यानं त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, मात्र आपला हेतू सायनाचा अपमान करण्याचा नव्हता, असं सिद्धार्थने आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे. या सगळ्या प्रकारावर आता खुद्द सायना नेहवालनेही प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या जागी खूश असल्याचं तिने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सिद्धार्थने आपल्या ट्वीटबद्दल काल संध्याकाळी सायनाची माफी मागितली. त्यानंतर सायना नेहवालने याविषयीचं आपलं मत व्यक्त केलं. आपण ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याचं कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटलं होतं,असंही सायना म्हणाली. एएनआयशी याविषयी बोलताना सायना म्हणाली, “तो माझ्याबद्दल काहीतरी बोलला, नंतर त्यानेच माफी मागितली. मला तर हेही कळलं नाही की हे सगळं इतकं व्हायरल का झालं? मी ट्विटरला ट्रेंडिंगला आहे हे पाहून मला खरंतर आश्चर्य वाटलं. मला आनंद आहे की सिद्धार्थने माफी मागितली. तुम्ही अशा प्रकारे एखाद्या महिलेला लक्ष्य करू शकत नाही. असो, मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मी माझ्या जागी, जिथे आहे तिथे खूश आहे. देव त्याचं भलं करो”.

काय आहे हे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर ५ जानेवारी रोजीच्या सायना नेहवालच्या ट्विटवर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली होती. सायनाच्या या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला आहे. “S**e ck जागतिक विजेती नशीब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटले.

हेही वाचा – “तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी…”; अभिनेता सिद्धार्थने केलेल्या टिकेवर सायनाच्या पतीची प्रतिक्रिया

सायनाच्या ट्विटवर सिद्धार्थने दिलेल्या प्रतिक्रियेने वादाला तोंड फुटले. अभिनेता सिद्धार्थच्या या ट्विटवर लोकांनी आक्षेप घेत महिला आयोगाकडे तक्रार केली. सिद्धार्थला महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. तसेच आयटी कायद्यांतर्गत सिद्धार्थविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. इतकेच नाही तर महिला आयोगाने ट्विटरला हे ट्विट काढून टाकण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून अहवाल मागवला आहे. वाद वाढल्यानंतर सिद्धार्थनेही स्पष्टीकरण दिले आहे. त्याचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे, कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal on actor siddharth tweet and apology vsk
First published on: 12-01-2022 at 13:10 IST