पगार आणि रोख बक्षिसांच्या थकबाकीनंतर माजी हॉकी प्रशिक्षक शोर्ड मरिनवर माहिती चोरी केल्याचा आरोप

हॉकी इंडियाने लॅपटॉप परत न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

Salary dues hockey india accuses Tokyo games coach Sjoerd Marijne data theft
हॉकी इंडियाने शोर्ड मरिन यांच्यावर डेटा चोरी केल्याचा आरोप केला आहे

इंडियन एक्स्प्रेसने वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही तासांनंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक असलेल्या शोर्ड मरिन यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांचे अंतिम वेतन आणि उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेले २५ लाख रुपयांचे बक्षीस अद्याप मिळालेले नाही. त्यानंतर आता शोर्ड मरिन यांच्यावर “डेटा चोरी” केल्याचा आरोप केला करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉप परत न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

याबाबत हॉकी इंडियाने सांगितले की, त्याच्या प्रलंबित पगारावर मरिनची टिप्पणी ही भारताच्या क्रीडा प्रशासनाचे काळे चित्र रंगवण्याचा एक दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहे आणि शोर्ड मरिन यांचे फक्त १८०० डॉलर वेतन अंतिम बाकी आहे. “लॅपटॉप परत न केल्यामुळे, हॉकी इंडिया एनओसी जारी करु शकत नाही आणि त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे मरिन अंतिम पगार रोखण्याचा अधिकार आहे. तसेच अमूल्य माहितीसह लॅपटॉप परत करण्यास सांगितल्याबद्दल भारतीय क्रीडा प्रशासनाला कलंकित करण्याचा मरिजनेचा प्रयत्न आहे,” असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.

ना पगार ना उत्तर प्रदेश सरकारकडून बक्षीस… टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाची व्यथा

मंगळवारी, कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा संस्थेला दोष न देता, माजी भारतीय प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की “त्यांना साईकडून शेवटचा पगार आणि उत्तर प्रदेश सरकारचे २५ लाख रुपयांचे बक्षीस अद्याप मिळालेले नाही. मी संबंधितांशी सतत संपर्कात आहे आणि लवकरच या समस्येचे निराकरण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.”

बुधवारी हॉकी इंडियाचे सरचिटणीस राजिंदर सिंग यांनी एका निवेदनाद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही हे निदर्शनास आणू शकतो की त्यांना दिलेला लॅपटॉप परत न करण्याचे कारण माहितीची चोरी करणे आहे. त्यात लॅपटॉपमध्ये भारतीय खेळाडूंची मोठी माहिती आहे. लॅपटॉप आणि त्यातील डेटा रिकव्हरी करणे सोपे व्हावे म्हणून आम्ही मरिन यांच्यावर आवश्यक दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करतो.

या विधानावर प्रतिक्रिया देताना, नेदरलँडमध्ये राहणाऱ्या मारिजने यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये क्रॅश झालेला लॅपटॉप परत पाठवण्याची प्रक्रिया त्यांनी आधीच सुरू केली आहे. “मी तो लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी माझ्यासोबत आणला होता पण तसे झाले नाही. मी लॅपटॉप परत करत आहे, मला हरकत नाही. मला माहित नाही की त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली पण मी हे स्पष्ट करू करतो की मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता. मी भारतात घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे आणि मी नेहमीच देशाशी जोडलेले राहीन,” असे  मरिनने म्हटले.

मरिन यांच्या नेतृत्वाखाली, भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले होते. यानंतर ते  नेदरलँडमधील टिलबर्ग या क्लबचे प्रशिक्षक झाले. सर्व ऑलिम्पिक खेळांमध्ये राष्ट्रीय संघांसाठी प्रशिक्षक नियुक्त करण्याची साईची जबाबदारी असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salary dues hockey india accuses tokyo games coach sjoerd marijne data theft abn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या