Salman Butt’s reaction to India’s defeat : रविवारी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांत मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. त्याचबरोबर ५ सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १८व्या षटकांत विजय मिळवला. दरम्यान, टीम इंडियाच्या पराभवावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सलमान बटने मोठे वक्तव्य केले आहे.

खरे, तर भारताची ही अवस्था पाहून त्यांच्या आत्मविश्वासाला पूर्णत: तडा गेला आहे, असे सलमान बटचे म्हणणे आहे. सलमान बट म्हणाला, हे त्यांच्या खेळाडूंच्या देहबोलीवरूनही कळत आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला की, फॉर्मेट काय आहे किंवा विरोधी टीम कोण आहे याने काही फरक पडत नाही.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
marathi actor atul kulkarni
वेडी आशा

अशा पराभवाने भारताच्या आत्मविश्वासाला नक्कीच धक्का बसेल – सलमान बट

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट म्हणाला, “विजयामुळे पुढील स्पर्धेसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला जातो. मात्र अशा पराभवामुळे भारताच्या आत्मविश्वासाला नक्कीच धक्का बसेल. हे तुम्हाला त्यांच्या मुलाखतीत दिसणार नाही, पण त्यांच्या देहबोलीत आणि निर्णयक्षमतेत तुम्हाला ते नक्कीच दिसेल.”

हेही वाचा – IND vs WI: संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनने केला मोठा पराक्रम; ‘हा’ कारनामा करणारा ठरला १३वा भारतीय

आपले म्हणणे पुढे चालू ठेवत तो पुढे म्हणाला की, “अनेक जण म्हणतील की ही एक टी-२० मालिका होती आणि भारतातील अनेक आघाडीचे खेळाडू गायब होते. पण भारतासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. युवा संघाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. वेस्ट इंडिज हा मोठा संघ आहे आणि त्यांना हरवणे भारतासाठी फार कठीण होते असेही नाही. या पराभवानंतर भारताचे संपूर्ण लक्ष आता आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर असेल.”

हेही वाचा – Shahid Afridi : गौतम गंभीरबद्दल शाहिद आफ्रिदीचे मोठं वक्तव्य; म्हणाला, “भारतीय संघात मी त्याच्यासारखा…”

सामन्याबद्दल बोलायचे, तर पाचव्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावाचे योगदान दिले होते. सूर्यकुमारने ४७ चेंडूचा सामना करतान ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. १६६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ब्रँडन किंगच्या नाबाद ८५ धावांच्या जोरावर १८ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकार लगावले.