सनिया आणि कारा अंतिम फेरीत

सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक मोसमातील पहिले जेतेपद पटकावण्याच्या उंबरठय़ावर उभे असून त्यांनी बीएनपी पारिबस डब्लूटीए खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक मोसमातील पहिले जेतेपद पटकावण्याच्या उंबरठय़ावर उभे असून त्यांनी बीएनपी पारिबस डब्लूटीए खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीमध्ये पाचव्या मानांकित सानिया आणि कारा जोडीने आठव्या मानांकित लूसी रॅडेका आणि जी झेंग यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये ६-४, ३-६, १०-७ असा पराभव केला. गेल्या वर्षी सानिया आणि कारा यांनी एकामागोमाग एक दोन जेतेपदे पटकावली होती, पण या वर्षांत त्यांना एकही जेतेपद पटकावता आलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sania cara pair reaches final of indian wells wta event

ताज्या बातम्या