Video: “मी जाडी झाली तरी माझ्यावर प्रेम करशील”; सानिया मिर्झाने शोएब मलिकला प्रश्न विचारताच…

सानिया मिर्झाने असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामच्या ‘You are Fat’ वाल्या रिलवर दोघांनी व्हिडिओ बनवला आहे.

Sania_Shoaib_Malik
Video: "मी जाडी झाली तरी माझ्यावर प्रेम करशील"; सानिया मिर्झाने शोएब मलिकला प्रश्न विचारताच…

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. सलग चार सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. शोएब मलिकही पाकिस्तानी संघात आहे. त्यामुळे शोएबची पत्नी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या युएईत आहे. त्यामुळे जेव्हा सामना नसेल तेव्हा शोएब आणि सानिया इन्स्टाग्रामवर मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. सानिया मिर्झाने असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामच्या ‘You are Fat’ वाल्या रिलवर दोघांनी व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओत सानिया मिर्झा मी जाडी झाली, तरी माझ्यावर तितकंच प्रेम करशील का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.

  • सानिया मिर्झा- मी जाडी झाली तरी माझ्या तितकंच प्रेम करशील
  • शोएब मलिक- हो
  • सानिया आणि शोएबचा मुलगा- मम्मी पहिल्यापासूनच जाडी आहेस

या संभाषणानंतर शोएब मलिकला हसू आवरत नाही. नेमकं पाणी पिताना मुलाने प्रतिक्रिया दिल्याने तोंडातून पाण्याचे फवारे बाहेर पडतात. हा रिल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केल्यानंतर चाहते शोएबला मेहुणा म्हणून संबोधतात. सानियाने हा व्हिडिओ रिट्विट करताना दोन हसणारे इमोजी आणि दोन हार्ट पोस्ट केले होते. शोएबला चाहत्यांनी जिजाजी म्हणून हाक मारण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही चाहत्यांनी असे केले आहे.

सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. सानिया मिर्झानं २०१० मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत लग्न केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sania mirza ask question about fatness her husband reaction rmt

Next Story
विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट
ताज्या बातम्या