दुखापतीमुळे टेनिस कारकीर्द धोक्यात आलेल्या सानिया मिर्झा हिला निवृत्तीपूर्वी ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आणखी काही अजिंक्यपदे मिळवायची आहेत.
सानियाला आजपर्यंत अनेक वेळा दुखापतींनी ग्रासले. स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होणार काय, असे विचारले असता सानिया म्हणाली, ‘‘दुखापती हा खेळाचा अविभाज्य घटक आहे. या दुखापतींवर मात करत जो पुढे जातो, तोच खेळाडू यशस्वी होतो. आजपर्यंत माझ्या गुडघ्यावर दोन वेळा तर एकदा मनगटावर शस्त्रक्रिया झाली आहे. कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आणखी जेतेपदे मिळविण्याचे माझे ध्येय आहे.’’