Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors: सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे दोन सर्वात यशस्वी खेळाडू सध्या त्यांच्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांमुळे लोकांमध्ये जास्त चर्चेत आहेत. सानिया ही भारतातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू आहे आणि शमीच्या वेगवान गोलंदाजीमुळे भारतातच नव्हे तर जगभरात तो टॉप गोलंदाजीपैकी एक ठरत आहे. २०२३ च्या ओडीआय विश्वचषक स्पर्धेच्या वेळी शमीच्या बळावर भारत अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकला होता. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे दोन महान खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा चालू आहे. यावर आता स्वतः सानियाच्या वडिलांनी मौन सोडून स्पष्ट उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सानिया आणि शमीच्या लग्नाची चर्चा का सुरु झाली?

सानिया मिर्झाचं लग्न हे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात चर्चेत राहिले होते. क्रिकेट स्टार शोएब मलिकशी लग्न केल्यावर अनेकदा सानियाला टीकेला सामोरे जावे लागले होते. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. मागील वर्षापासून सानिया आणि शोएब यांच्यात सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्याच, पण मध्यंतरी एका शो मध्ये सानिया शोएब एकत्र दिसल्याने या चर्चा थांबल्या होत्या. पण त्यानंतर लगेचच या वर्षाच्या सुरुवातीला त्या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली. शोएब मलिकने सना जावेदशी लग्न केले आहे. तर शमी हा त्याची पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला आहे. हसीन जहाँने यापूर्वी शमीवर अनेकदा वेगवेगळे आरोप लगावले आहेत.

दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात आलेल्या वळणांमुळे अनेक चाहत्यांनी शमी व सानियाने लग्न करावे असे सुचवायला सुरुवात केले होते आणि त्यातूनच लग्नाच्या अफवा पसरू लागल्या. यावर सानिया मिर्झाचे वडील इम्रान यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “हा मुद्दा म्हणजे निव्वळ कचरा आहे. ती त्याला भेटलीही नाही.”

भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झाने क्रिकेटर पती शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी आता अलीकडेच हजच्या पवित्र प्रवासाला सुरुवात केली.सानियाने व्यावसायिक टेनिसमधूनही निवृत्ती घेतली आहे, ती अलीकडेच प्रतिष्ठित फ्रेंच ओपन २०२४ साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत होती. हज प्रवासासाठी निघताना सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून शेअर केले होते की, “मी आता ‘परिवर्तनात्मक अनुभव’ घेण्यासाठी जात आहे यातून एक चांगली व्यक्ती म्हणून मी परत यावं अशी माझी इच्छा आहे. याची सुरुवात म्हणून मी आतापर्यंत झालेल्या चुका व माझ्यातील उणिवांसाठी माफी मागते.”

हे ही वाचा<< मोहम्मद शमी: हिंसाचाराचा आरोप, पत्नीविरुद्ध कायदेशीर लढा, अपघात आणि समस्यांचे गर्ते

सानिया अलीकडेच एका प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये देखील दिसली होती. जिथे तिने कॉमेडियन कपिल शर्माशी तिच्या कारकिर्दीबद्दल, विशेषत: २०१५ -१६ मध्ये मार्टिना हिंगिससोबत केलेल्या भागीदारीबद्दल गप्पा मारल्या होत्या. सानिया म्हणाली की, “जेव्हा एखादा खेळाडू लागोपाठ जिंकत असतो तेव्हा तो झोनमध्ये आहे असं म्हटलं जातं आणि खेळाडू म्हणून मला असं वाटतं मी आणि मार्टिना त्या सहा महिन्यात झोनमध्येच होतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza marrying mohammed shami tennis icon father imran breaks silence on rumors says this is rubbish sania went to haj yatra svs