आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टपासून गेली काही वर्ष दुरावलेल्या सानिया मिर्झाने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तब्बल ४ वर्षांच्या कालावधीनंतर सानिया मिर्झाची भारतीय संघात निवड झाली आहे. फेडरेशन चषकासाठीच्या युक्रेनविरुद्धच्या सामन्यात सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर पुनरागमन करेल.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पधा : ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत १३.६ टक्के वाढ

सानिया मिर्झासोबत भारतीय संघात अंकिता रैना, रिया भाटीया, ऋुतुजा भोसले आणि करमन कौर थंडी यांची निवड झालेली आहे. सानिया आपला पहिला सामना जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या नाडीया किचेनॉकविरुद्ध खेळेल. २०१६ साली सानिया मिर्झा आपला अखेरचा फेडरेशन चषकाचा सामना खेळली होती. यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दाम्पत्याला मुलगा झाला, ज्यामुळे तिने टेनिसमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे ४ वर्षांच्या पुनरागमनानंतर सानिया कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.