ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराभवानंतर, सानिया मिर्झाने घोषित केले की २०२२ हा तिचा दौर्‍यावरील शेवटचा सीझन असेल आणि तिला तो खरोखर पूर्ण करायचा आहे. “हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहित नाही”, असं सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ग्रँडस्लॅम विजेतेपदासह कारकीर्द संपेल? सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत

“त्याची बरीच कारणे आहेत. चला आता मी खेळणार नाही’ इतके हे सोपे नाही. मला असे वाटते की माझ्या कमबॅकला जास्त वेळ लागतो आहे. मला वाटते, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर इतका प्रवास करून त्याला धोक्यात आणत आहे, हे मला लक्षात घेतले पाहिजे. माझे शरीर साथ देत नाहीये. आज माझा गुडघा खरोखरच दुखत होता आणि त्यामुळेच आम्ही हरलो असे मी म्हणत नाही पण मला वाटते की जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे बरे होण्यास वेळ लागतो आहे,” असंही सानिया पुढे म्हणाली.

सानिया मिर्झाचा प्रोफेशनल टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत जाहीर केला निर्णय

सानिया मिर्झा २००३ पासून व्यावसायिक दौऱ्यावर खेळत आहे आणि टेनिसमध्ये अव्वल स्थानावर खेळत असताना त्याला १९ वर्षे झाली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza tennisstar retirement 2022 will be her last season vsk
First published on: 19-01-2022 at 15:41 IST