Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यनने त्याच्या हार्माेनल ट्रान्सफॉर्मेशन थेरपीचा प्रवास एका व्हीडिओच्या माध्यामातून शेअर केला आहे. या थेरपीनंतर २३ वर्षीय आर्यन बांगर याने आता आपली ओळख आर्यनवरून अनया अशी करून दिली आहे. आर्यन बांगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांबरोबर फोटो आहेत. यानंतर हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतरचे देखील आहेत काही फोटो आहेत. १० महिन्यांच्या या थेरपीनंतर आर्यन आता अनया बनला आहे.

वडिलांप्रमाणेच आर्यनदेखील क्रिकेटपटू आहे, आर्यन हा डावखुरा फलंदाज असून तो स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये इस्लाम जिमखान्याकडून खेळला आहे. त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आणि भरपूर धावा केल्या होत्या.

tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Actor and TVK President Vijay on Dr BR Ambedkar
Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान
Rohit Sharma ends fan 10 year long wait for an autograph
Rohit Sharma : ‘रोहित भाई, १० वर्षे झाली…’, हिटमॅनने ऑटोग्राफच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्याची पूर्ण केली इच्छा, पाहा VIDEO
Sai Tamhankar favorite person is Prasad Oak from Maharashtrachi Hasyajatra
Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा
Rohit Sharma Baby Boy Name Ahaan
Rohit Sharma : रोहित शर्माच्या मुलाचे काय ठेवले नाव? पत्नी रितिका सजदेहने इन्स्टा स्टोरी शेअर करत दिली माहिती

हेही वाचा – Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

अनाया झाल्यानंतर सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याच्या माझ्या स्वप्नाचा मागोवा घेण हा त्याग आणि समर्पणाने भरलेला प्रवास होता. सकाळी उठून मैदानात जाण्यापासून ते इतरांच्या शंका आणि निर्णयांना सामोर जात प्रत्येक पायरीवर भरपूर ताकदीची गरज भासत असे. पण या खेळाच्या पलीकडे जाऊन माझा अजून एक प्रवास होता, तो म्हणजे आत्मशोधाचा. आत्मशोधाचा हा मार्ग पाहताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.

हेही वाचा – चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

पुढे ती म्हणाली, “माझ्यातील खऱ्या स्वत्वाला भेटणं म्हणजे कठीण निवड होती, गोष्टी अजिबात सोप्या नसतानाही मी खरी कोण आहे यासाठी उभं राहणं, ही मोठी गोष्ट होती. आज, मला कोणत्याही स्तरावर किंवा श्रेणीमध्ये आवडत असलेल्या खेळाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो, केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर खरी मी म्हणून. हा प्रवास सोपा नव्हता, पण स्वतःला शोधणं हा सगळ्यात मोठा विजय आहे.”

अनया सध्या कुठे राहते आणि काय करते?

अनया ही सध्या मँचेस्टरमध्ये राहते आणि तेथील एका काऊंटी क्लबसाठी क्रिकेट खेळते. काऊंटीमधील कोणत्या क्लबमधून ती खेळते याबद्दल अद्याप कळू शकलं नाही पण तिच्या इन्स्टाग्रामवरील रीलमधून तिने एका सामन्यात १४५ धावा केल्याचे समजत आहे. यापूर्वी अनयाने तिच्या इन्स्टाग्रामवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्रान्सजेंडर असलेल्या एका व्यक्तीला महिला क्रिकेट खेळण्यास बंदी घातल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

Story img Loader