संजूबाबाची नवी ‘इनिंग’, ‘एमसीएल’मधील क्रिकेट संघ खरेदी

येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लवकरच आपली नवी ‘इनिंग’ सुरू करणार आहे.

Sanjay Dutt
तुरूंगवारीनंतर संजय दत्त क्रिकेटच्या मैदानात आपले नशीब आजमवणार आहे.

येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लवकरच आपली नवी ‘इनिंग’ सुरू करणार आहे. तुरूंगवारीनंतर संजय दत्त क्रिकेटच्या मैदानात आपले नशीब आजमवणार आहे. यूएईमध्ये होणाऱया ‘मास्टर्स चॅम्पियन्स लीग’मध्ये(एमसीएल) संजूबाबा स्वत:च्या मालकीचा संघ उतरवणार आहे. संजय दत्त पुढच्या वर्षी शिक्षा संपवून तुरूंगातून बाहेर येणार आहे. त्याच वर्षी यूएईमध्ये निवृत्त क्रिकेटपटूंचा सहभाग असलेली एमसीएल स्पर्धा रंगणार आहे. संजय दत्तच्या अनुपस्थितीत त्याचे आर्थिक व्यवहार पत्नी मान्यता सांभाळत असून तिने एमसीएलशी करार केला आहे. एमसीएलमध्ये ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutt buys team in the masters champions league

ताज्या बातम्या