scorecardresearch

Team India: जसप्रीत बुमराह, संजू सॅमसनच्या पुनरागमनाबद्दल मोठी अपडेट; जाणून घ्या कधीपासून परतणार भारतीय संघात?

Jasprit Bumrah Updates: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण लवकरच तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हे दोघे ऑस्ट्रेलियविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग असतील.

Sanju Samson and Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप २०२२ आणि त्यानंतर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळू शकला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. बुमराह जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परतणार होता, परंतु त्याच्या पाठीत जडपणा जाणवू लागल्याने त्याला पुन्हा संघातून बाहेर व्हावे लागले होते.

त्याचबरोबर संजू सॅमसनही गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो. दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट समोर आली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, ”संजू त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यासाठी एनसीए येथे आला आहे. मी ऐकले आहे की, तो निवडीसाठी १०० टक्के फिट आहे. बुमराहबद्दल बोलायचे तर, त्याला पुनरागमन करण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून तो पुनरागमन करेल, असे मानले जात आहे. पण तो कितपत तंदुरुस्त आहे यावर सर्व काही अवलंबून आहे.”

हेही वाचा – ICC T20 Ranking: सूर्याने मोडला विराटचा टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा फलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा १३ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यामध्ये बुमराहचा समावेश नाही. या अपडेटनंतर तो उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सॅमसनला संघातून वगळण्यात आले होते. कारण झेल घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:57 IST
ताज्या बातम्या