scorecardresearch

Team India: संजू सॅमसन आणि शिखर धवन भारतासाठी वनडे विश्वचषक खेळणार? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने वाढवली आशा

Team India contract list : बीसीसीआयने शिखर धवनला सी गटात कायम ठेवले आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनचाही केंद्रीय करारात समावेश केला आहे.

Sanju Samson and Shikhar Dhawan Updates
शिखर आणि संजू (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

BCCI annual contract list: बीसीसीआयने सोमवारी पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा करताना अनेक धक्कादायक बदल केले. बोर्डाने त्यांच्या करारातून एकीकडे सात खेळाडूंना वगळले असताना, दुसरीकडे पाच नवीन खेळाडूंचाही समावेश केला आहे. दरम्यान बीसीसीआयने संजू सॅमसन आणि शिखर धवनला वार्षिक कराराच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे हे दोन फलंदाज टीम इंडियासाठी पुन्हा एकदा खेळताना दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजू सॅमसन, दीपक हुडा, इशान किशन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत या पाच खेळाडूंचा बोर्डाने वार्षिक कराराच्या यादीत समावेश केला आहे. यावेळी इतर काही खेळाडूंना बढती देण्यात आली, तर काहींची पदावनतीही करण्यात आली.

धवनला करारात कायम ठेवण्यात आले –

यावेळी भारतीय संघाचा वरिष्ठ सलामीवीर फलंदाज शिखर धवनला या करारात कायम ठेवण्यात आले आहे. जे धक्कादायक आहे, कारण तो कसोटी किंवा टी-२० खेळत नाही. होय, तो टीम इंडियासाठी एकदिवसीय सामने नक्कीच खेळत होता, परंतु डिसेंबरपासून त्याला या संघातही संधी मिळाली नाही. मग शिखर धवनला वार्षिक कराराचा भाग का करण्यात आला हा मोठा प्रश्न आहे. गतवर्षीप्रमाणेच या वेळीही धवनचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला असून, यामध्ये खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात.

हेही वाचा – IPL 2023: केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; ‘या’ युवा खेळाडूच्या हाती असणार संघाची धुरा

शिखर धवन वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकतो –

शिखर धवनला वार्षिक करारात सामील केल्याने, पुन्हा एकदा त्याच्या टीम इंडियासाठी खेळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बहुधा तो एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या मोहिमेसाठी भारतीय संघाचा भाग असल्याचे संकेत आहे. खरं तर, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यास, तो किमान सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अशा स्थितीत भारताला काही मधल्या फळीतील फलंदाजांची निवड करून त्यांना तयार करावे लागेल. याशिवाय भारताला काही उत्कृष्ट सलामीवीरांचीही गरज आहे.

संजू सॅमसनलाही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळणार-

संजू सॅमसन हा चांगला फलंदाज आहे यात शंका नाही, पण संघात सातत्यपूर्ण संधी न मिळाल्याने त्याच्या प्रतिभेचा योग्य वापर होत नाही. यावेळी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार असून भारतीय संघाचा नियमित यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे. विश्वचषकापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल का, याचे उत्तर कोणाकडे नाही.

हेही वाचा – IPL 2023: केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; ‘या’ युवा खेळाडूच्या हाती असणार संघाची धुरा

पंत संघात नसेल तर भारताकडे अर्धवेळ यष्टीरक्षक केएल राहुल आणि इशान किशन आहेत. परंतु भारताला निव्वळ कीपर आणि उत्कृष्ट फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे संजू सॅमसन हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणून कदाचित याचा फायदा संजूला मिळेल. परंतु यासाठी त्याला आयपीएल २०२३ मध्ये कामगिरी करावी लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या