Sanju Samson Becomes The Co Owner of Football Team: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने फुटबॉलमध्ये पदार्पण केले आहे. क्रिकेट खेळता खेळता संजू सॅमसन आता फुटबॉल संघाचा सहमालक झाला आहे. संजू हा मूळचा केरळमधील राहणारा आहे, त्याने आपल्या राज्याचा फुटबॉल फ्रँचाईचीमध्ये भागीदारी घेतली आहे. केरळ सुपर लीग नावाची नवीन फुटबॉल लीग केरळमध्ये सुरू झाली आहे.

क्रिकेटच्या पलीकडे जाऊन, संजू सॅमसनने क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. केरळ सुपर लीग (KSL) मध्ये सहभागी होणाऱ्या मलप्पुरम FC या फुटबॉल संघाचा सह-मालक संजू सॅमसन झाला आहे. कोची येथील जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमवर फोर्का कोचीवर २-१ असा विजय मिळवून मलप्पुरम एफसीच्या ऐतिहासिक पहिल्या विजयाची चर्चा आहे. मलप्पुरम जिल्ह्यात स्थित, संघ आपले घरचे सामने पय्यानाड स्टेडियमवर खेळतो, ज्याला मलप्पुरम जिल्हा क्रीडा संकुल स्टेडियम असेही म्हणतात, ज्याची आसन क्षमता ३०,००० प्रेक्षकांची आहे.

हेही वाचा – AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?

यंदा केरळ सुपर लीग म्हणजेच KSL चा पहिला हंगाम आहे, ज्यामध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. KSL हा भारताच्या मुख्य फुटबॉल संरचनेचा भाग नसला तरी स्थानिक फुटबॉल प्रतिभेला जोपासण्यात एक भूमिका बजावत आहे. आता सॅमसन अजमल बिस्मी, डॉ. अन्वर अमीन चेलात आणि बेबी नीलांबरा यांच्यासह मलप्पुरम एफसीचा मालकही असेल.

या लीगमध्ये कालिकत एफसी, कन्नूर वॉरियर्स एफसी, कोची फोर्का एफसी, मलप्पुरम एफसी, तिरुवनंतपुरम कॉम्बन्स एफसी आणि थ्रिसूर मॅजिक एफसी असे एकूण ६ संघ सहभागी होत आहेत. साखळी सामन्यानंतर यातील ४ संघ बाद फेरीत जाणार आहेत. लीगचा पहिला सामना मलप्पुरम आणि कोची यांच्यात ७ सप्टेंबर रोजी झाला. यामध्ये सॅमसनच्या संघाने २-० असा विजय मिळवला.

हेही वाचा – Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”

संजू सॅमसनपूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटू फुटबॉल संघांचे मालक बनले आहेत. फुटबॉल फ्रँचायझीमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. अनुभवी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली हा प्रसिद्ध फुटबॉल फ्रँचायझी मोहन बागानचा सह-मालक आहे. तर महेंद्रसिंग धोनीची चेन्नईयन एफसीमध्ये भागीदारी आहे. याशिवाय गोवा एफसीमध्ये विराट कोहलीचे मालकी हक्क आहेत.

हेही वाचा – ENG vs SL: WTC Points Table मध्ये मोठी उलथापालथ, पराभवानंतर इंग्लंड टॉप-५ मधून बाहेर; श्रीलंकेने घेतली मोठी झेप

दुलीप ट्रॉफीमध्ये या संघात

संजू सॅमसन सध्या दुलीप ट्रॉफीचे सामने खेळत आहे. इशान किशनला झालेल्या दुखापतीमुळे त्याचा भारत डी संघात शेवटच्या क्षणी समावेश झाला, ज्यामुळे तो पहिल्या फेरीतून बाहेर पडला. त्याचा उशीरा समावेश करूनही, सॅमसनला इंडिया डी च्या भारत क विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. सॅमसनला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी श्रीकर भरत खेळला पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सॅमसनला पुढील फेरीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे.