scorecardresearch

Premium

IND vs WI: संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनने केला मोठा पराक्रम; ‘हा’ कारनामा करणारा ठरला १३वा भारतीय

India vs West Indies T20 series: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत खेळलेल्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या मालिकेत संजू सॅमसनने अव्घ्या ३२ धावा केल्या. पंरतु तरीही त्यान एक खास कारनामा केला आहे.

India vs West Indies T20 series
संजू सॅमसन (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Sanju Samson completes 6000 runs in T20 cricket : भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. त्याचबरोबर या विजयाच्या जोरावर ३-२ अशा फरकाने मालिका आपल्या नावे केली. या दौऱ्यात स्टार भारतीय फलंदाज संजू सॅमसन पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यानंतरही संजू सॅमसनने एक खास कारनामा केला आहे.

त्याने या मालिकेत ४ टी-२० सामने खेळले आणि फक्त ३२ धावा केल्या. त्याला तीन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. तिन्ही टी-२० सामन्यांमध्ये तो खास कामगिरी करू शकला नाही आणि चाहत्यांची निराशा केली. पूर्ण फ्लॉप ठरल्यानंतरही संजू सॅमसनने एक कारनामा केला आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये ६००० धावा करणारा तो १३वा भारतीय फलंदाज ठरला आहे. संजूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-१० सामन्यात १३ धावा करत ही खास कामगिरी केली.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS: मिचेल मार्शला बाद करत बुमराहने केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
After defeated the Kangaroos in the first ODI KL Rahul Rahul's big statement Said This is not my first time holding the captaincy
KL Rahul: पहिल्या वन डेत कांगारूंना धूळ चारल्यानंतर के.एल. राहुलचे मोठे विधान; म्हणाला, “ही माझी पहिलीच वेळ…”
Ishan challenged all teams in World Cup Said If anyone scores two runs against me I will run out
Ishan Kishan: इशानने वर्ल्डकपमधील सर्व संघांना दिले आव्हान; म्हणाला, “माझ्याविरुद्ध कोणी दोन धावा काढल्या तर मी…”

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे अव्वल ५ भारतीय फलंदाज –

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ११९६५ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे नाव येते, ज्याने ११०३५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे, ज्याने टी-२० फॉरमॅटमध्ये ९६४५ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर सुरेश रैनाचे नाव आहे, ज्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत एकूण ८६५४ धावा केल्या आहेत. या यादीत पाचव्या क्रमांकावर रॉबिन उथप्पाचे नाव आहे, ज्याने ७२७२ धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन सोशल मीडियावर होतोय ट्रोल –

वेस्ट इंडिजविरुद्ध फ्लॉप ठरलेला संजू सॅमसन सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याच्या संघातील स्थानावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनचीही संघात निवड करण्यात आली आहे, जिथे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी असेल. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली आहे.

हेही वाचा – Shahid Afridi : गौतम गंभीरबद्दल शाहिद आफ्रिदीचे मोठं वक्तव्य; म्हणाला, “भारतीय संघात मी त्याच्यासारखा…”

सामन्याबद्दल बोलायचे, तर पाचव्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावाचे योगदान दिले होते. सूर्यकुमारने ४७ चेंडूचा सामना करतान ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. १६६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ब्रँडन किंगच्या नाबाद ८५ धावांच्या जोरावर १८ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकार लगावले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanju samson completes 6000 runs in t20 cricket in ind vs wi 5th match vbm

First published on: 14-08-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×