Sanju Samson Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत संजू सॅमसनच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण एकदा संधी मिळाल्यानंतर संजू सॅमसनने मागे वळून पाहिलं नाही. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

संजू सॅमसनने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतकांची हॅट्रिक केली आहे. याआधी १ मार्चला कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात संजूने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात संजूने ४२ चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती. आता न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात संजूकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. यासह तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतकांची हॅट्रिक करणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल या यादीत अव्वल स्थानी आहे. केएल राहुलने २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली होती. या स्पर्धेत केएल राहुलने अफगाणिस्तानविरूद्ध खेळताना ६९ धावांची खेळी केली होती. तर स्कॉटलंडविरूद्ध खेळताना त्याने ५० धावा केल्या होत्या. तर नामिबियाविरूद्ध खेळताना त्याने नाबाद ५४ धावांची खेळी केली होती. विराट कोहलीच्या नावे देखील लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. पण त्याने हा कारनामा २ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मिळून केला होता. विराटने २०१६ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात ८२ धावांची खेळी केली होती. तर वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५७ धावांची खेळी केली होती. तर २०२१ टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने पाकिस्तानविरूद्ध खेळताना ५७ धावांची खेळी केली होती.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

India Playing XI vs New Zealand: भारत प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

New Zealand Playing XI vs India: न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन
टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी