Sanju Samson Century: आयपीएल २०२६ स्पर्धेआधी चेन्नई सुपर किंग्ज संघात सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला होता. चेन्नईने राजस्थान रॉयल्स संघासोबत ट्रेड डिल केली अन् थेट राजस्थानच्या कर्णधाराला आपल्या संघात स्थान दिलं. संजू सॅमसनला चेन्नईकडून खेळण्याची संधी तर मिळाली, पण तो स्वत:ला सिद्ध करू शकला नव्हता. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळताना त्याचं रौद्ररुप पाहायला मिळालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने ५२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे. हे त्याचं आयपीएल कारकिर्दीतील चौथं शतक ठरलं. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. चेन्नईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानावर आली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. ऋतुराज गायकवाड १५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू आणि आयुषने मिळून संघाचा डाव सांभाळला. संजूने ५२ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याचं वैयक्तिक पहिलं आणि आयपीएल २०२६ स्पर्धेतील देखील पहिलं शतक ठरलं आहे. या शतकी खेळीच्या बळावर संजू सॅमसनने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
संजू सॅमसनचं चेन्नईकडून खेळताना झळकावलेलं हे पहिलं शतक विक्रमी ठरलं आहे. संजू सॅमसन हा आयपीएल स्पर्धेत ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. संजूने आधी दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना शतक झळकावलं होतं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळतानाही त्याने शतक झळकावलं आहे. यावर्षी तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. यासह तो ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना शतक झळकावणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
चेन्नईने उभारला २१३ धावांचा डोंगर
या सामन्यात डावाची सुरुवात करताना संजू आणि ऋतुराजच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी मिळून ६२ धावा जोडल्या. ऋतुराज गायकवाड १५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू आणि आयुषने मिळून दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आयुष म्हात्रे ५९ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्याच्या जागी शिवम दुबे फलंदाजीला आला. त्याने १० चेंडूत २ चौकार १ षटकार खेचून २० धावा केल्या. तर संजू सॅमसन ११५ धावांवर नाबाद राहिला. या खेळीच्या बळावर चेन्नईने २१२ धावांचा डोंगर उभारला.
