Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century: संजू सॅमसनने १० षटकारांसह दणदणीत शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानानवर विस्फोटक फलंदाजी केली. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वादळी फलंदाजी करत आपले सलग दुसरे टी-२० शतक केले आहे. संजूने अवघ्या ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण करत त्याच्या टी-२० कारकिर्दीतील दुसरं टी-२० शतक पूर्ण केलं. या शतकासह संजू सॅमसनने मोठा इतिहास घडवला आहे.

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४७ चेंडूत शतक पूर्ण केले, मात्र शतक झळकावल्यानंतर तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि तो बाद झाला. त्याने ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा केल्या.

Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाचा – IND vs SA 1st T20 Live Score: संजूच्या शतकासह भारताने उभारला धावांचा डोंगर, दक्षिण आफ्रिकेला २०० अधिक धावांचे लक्ष्य

संजू आता सलग दुसऱ्या सामन्यात टी-२० शतक झळकावत भारतासाठी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आता तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत केएल राहुलसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव प्रत्येकी चार शतकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.

हेही वाचा – KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ

संजू सॅमसनने बांगलादेशविरूद्धच्या टी-२० सामन्यात पहिले टी-२० शतक झळकावले होते. आता संजूने सलग पुढच्याच सामन्यात आफ्रिकेविरूद्ध दुसरे शतक झळकावत कोणालाही जमली नाही अशी कामगिरी करून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२०क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती. सलग दोन टी-२० सामन्यात शतकं झळकावणारा संजू एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने गुस्ताव्ह मॅकॉन, रायली रूसो, फिल सॉल्ट यांची बरोबरी केली आहे.

हेही वाचा – PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

सलग दोन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये शतकं झळकावणारे खेळाडू:

फ्रान्स – गुस्ताव मॅकॉन, २०२२
दक्षिण आफ्रिका – रायली रुसो, २०२२
इंग्लंड फिल सॉल्ट – २०२३
भारत – संजू सॅमसन, २०२४

सर्वाधिक षटकार लगावणारा संयुक्त भारतीय फलंदाज

संजू सॅमसनने आफ्रिकेविरूद्धच्या १०७ धावांच्या खेळीत सर्वाधिक १० षटकार लगावत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने २०१७ मध्ये इंदोरमध्ये झालेल्या श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात एका खेळीत १० षटकार लगावले होते. यासह संजूने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

संजू सॅमसनने २०१५ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. पण नंतर खराब फॉर्ममुळे तो संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी ३४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७०१ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर

संजू सॅमसन हा त्याच्या कारकिर्दीत दोन किंवा त्याहून अधिक टी-२० मध्ये शतकं करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. संजूपूर्वी रोहित शर्मा (५ शतकं), सूर्यकुमार यादव (४ शतकं) आणि केएल राहुल (२ शतकं) यांनी ही कामगिरी केली आहे. रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक ५ शतकं झळकावली.

Story img Loader