scorecardresearch

टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी Sanju Samson सज्ज…! मैदानावर फुल इंटेनसिटीने गाळतोय घाम, पाहा VIDEO

Sanju Samson Video: टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीतून बरा झाला आहे. तो मैदानावर पूर्ण तीव्रतेने परतला आहे. याआधीही त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. आता सराव करताना व्हिडिओ शेअर केला आहे

Sanju Samson has shared a video of himself training
संजू सॅमसन (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर. संजू सॅमसनला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. हा सामना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खेळला गेला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय तर सोडा देशांतर्गत क्रिकेटही खेळू शकला नाही. मात्र, आता तो पूर्ण जोमाने मैदानात उतरला आहे. त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कर्णधार संजू सॅमसनच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिला जाऊ शकतो. ज्यामध्ये सॅमसन विविध फिटनेस ड्रिल करताना दिसत आहे. सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून पूर्ण तीव्रतेने मैदानात उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे. याआधीही एक फोटो शेअर करताना त्याने फलंदाजीचा सराव सुरू केल्याचे सांगितले होते.

राजस्थान रॉयल्सच्या फिटनेस तज्ञाने इंस्टाग्रामवर संजू सॅमसनचा व्हिडिओ शेअर केला आणि रॉबर्ट लिंडचा एक कोट शेअर केला, “आधी कधीही न ऐकलेल्या सत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हजार वेळा ऐकलेल्या खोट्यावर विश्वास ठेवणे सोपे आहे.” त्याचवेळी राजस्थान रॉयल्सनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी संजू सॅमसन पुनरागमन करणार असल्याचे लिहिले आहे.

हेही वाचा – Deepak Chahar: CSK चा स्टार खेळाडू गंगेच्या काठावर पत्नीसोबत करतोय योगा आणि व्यायाम; पाहा VIDEO

मात्र, संजू सॅमसन आयपीएलपूर्वी टीम इंडियासाठी एकही सामना खेळेल, अशी शक्यता फार कमी आहे. कारण तो एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग नाही. यावर्षी टीम इंडियाचे खूप कमी टी-२० सामने आहेत. सॅमसनची स्पर्धा अनेक भारतीय दिग्गजांशीही आहे. टीममध्ये इशान किशन आणि केएल राहुलसारखे महान यष्टिरक्षकही आहेत. अशा स्थितीत त्याला संघात आपली जागा निश्चित करण्यात थोडी अडचण येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:06 IST
ताज्या बातम्या