scorecardresearch

Saqlain Mushtaq: सचिन तेंडुलकरला स्लेजिंग करणं मला पडलं महागात, कारण… पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केला खुलासा

Saqlain Mushtaq Disclosure: पाकिस्तानचा माजी फिरकीपटू आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी सचिन तेंडुलकरबद्दल एक किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये सचिनला स्लेज करणे त्याला महागात पडले होते.

Saqlain Mushtaq Disclosure about sachin tendulkar
सचिन तेंडुलकर (फोटो- संग्रहितछायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Saqlain Mushtaq on Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील फलंदाजीशी संबंधित जवळपास सर्व विक्रम आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, शतकांचे महाशतक हे असे विक्रम आहेत, जे मोडणे कठीण आहे. सचिनने त्याच्या काळात ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम, कर्टली अॅम्ब्रोस, वकार युनूस, सकलेन मुश्ताक, मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांसारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे. आता सकलेन मुश्ताकने सचिनशी संबंधित एक संस्मरणीय किस्सा शेअर केला आहे.

मी थोडा अहंकारी झालो होतो –

सकलेन मुश्ताकने ‘द नादिर अली पॉडकास्ट’वर सांगितले, “माझा सचिन तेंडुलकरसोबत एक किस्सा आहे. आम्ही कॅनडाला गेलो होतो, मी युवा असताना इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळल्यानंतर तिथे गेलो होतो आणि गोलंदाजी हे माझे स्वतःचे विश्व होते. काऊंटी क्रिकेट खेळल्यानंतर मी थोडा अहंकारी झालो होतो. सचिन तेंडुलकर हे खूप समजूतदार क्रिकेटपटू होते मी पहिले षटक खूप कडक टाकले आणि नंतर त्याला स्लेजिंग केले… मी काही कठोर शब्द देखील वापरले.”

हेही वाचा – IPL 2023: १६व्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादची नवीन जर्सी लाँच; पाहा मजेदार VIDEO

सचिन खेळपट्टीवर कधी सेट झाले कळाले नाही –

सकलेन पुढे म्हणाला,”ते (सचिन) माझ्याकडे आले आणि खूप प्रेमाने म्हणाले, साकी, तू असं काही करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि तू असा शब्दही वापरणार नाहीस. मला वाटले की तू खूप सभ्य व्यक्ती आहेस. त्यांनी हे सर्व मला खूप प्रेमाने सांगितले, माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांचे शब्द पुढची चार षटके माझ्या कानावर आदळत राहिले. मी त्यांच्या बोलण्यात इतका बुडालो होतो की, मला समजले नाही की या दरम्यान सचिन खेळपट्टीवर कधी सेट झाले.”

मला चापटी मारल्यासारखे वाटायचे –

सकलेन पुढे म्हणाला, “हे सगळे डावपेच आहेत. जेव्हा कोणी तुमच्याशी चांगले बोलतो, तेव्हा तुम्ही त्याच्या बोलण्याचा विचार करू लागता. मी माझ्याच विचारात होतो आणि सचिन तेंडुलकर त्यानंतर चार-पाच षटकांत एक तरी चौकार मारत राहिले आणि मी त्याचा आदर करू लागलो. जेव्हा ते क्रीजमधून बाहेर येत आणि चौकार लगावत, तेव्हा मला वाटायचे की त्यांनी मला चापटी मारली आहे.”

हेही वाचा – LLC 2023: सुरेश रैना आणि हरभजन सिंगने नाटू-नाटू गाण्यावर धरला ठेका; VIDEO होतोय व्हायरल

बॅटने नाही तर त्यांच्या बोलण्याने जाळ्यात अडकलो –

मुश्ताक म्हणाला, “मग मला समजले की त्यांनी माझ्यासोबत एक खेळ केला होता, तोपर्यंत ते क्रीजवर सेट झाले होते आणि गोष्टी आमच्या हाताबाहेर गेल्या होत्या. मग संध्याकाळी सामन्यानंतर आम्ही हॉटेल मध्ये भेटलो. मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही खूप हुशार आहात आणि ते हसायला लागले. त्यांनी मला किती चांगल्या पद्धतीने जाळ्यात अडकवले, तेही बॅटने नाही तर त्यांच्या बोलण्याने.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 16:42 IST