’  दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना व्हावा, ही इच्छा पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकने व्यक्त केली आहे. रविवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून विजय मिळवला. दोन्ही संघांमधील क्रीडात्मक लढतीमुळे मानवतेचा संदेश दिला गेल्याचे मत सकलेनने व्यक्त केले आहे. ‘‘आम्ही पराभूत केले असले तरी भारताचा संघ मजबूत आहे. विश्वविजेतेपदाच्या दावेदारांपैकीही त्यांना गणले जात आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना झाल्यास उत्तम ठरेल,’’ असे सकलेनने सांगितले.

होल्डर विंडीज संघात

’  दुबई : दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज ओबेड मॅक्कॉयच्या जागी अष्टपैलू जेसन होल्डरचा वेस्ट इंडिज संघात समावेशाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे. ‘अव्वल-१२’ फेरीमधील दोन्ही सामने गमावणाऱ्या विंडीजचा शुक्रवारी शारजा येथे बांगलादेशशी सामना होणार आहे. होल्डरकडे १९९ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.