Sara Tendulkar Viral Video: आयपीएल २०२६ दरम्यान सारा तेंडुलकरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सारा तेंडुलकरला आयपीएल सामना पाहण्यासाठी लखनौमध्ये दाखल झाली आहे. यादरम्यान एअरपोर्टवर तिला प्रश्न विचारण्यात आला की ती लखनौ किंवा गुजरात कोणत्या संघाला सपोर्ट करणार यावर तिने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
सारा तेंडुलकर १२ एप्रिलला गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या सामन्यासाठी लखनौमध्ये दाखल झाली आहे. एअरपोर्टवर पापाराझींनी तिला कोणत्या संघाला प्रश्न विचारत आहेस प्रश्न विचारताच ती लाजली. सारा तेंडुलकरबरोबर यादरम्यान तिची वहिनी सानिया चंडोकदेखील होती.
सारा तेंडुलकर अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानियासोबत विमानतळावरून जात असताना पापाराझींनी तिला हा प्रश्न विचारला. वारंवार विचारूनही साराने थेट उत्तर दिलं नाही. मात्र, तिला तिचं हसू आवरता आलं नाही आणि ती किंचित लाजतानासुद्धा दिसली. ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. साराला हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू म्हणजे तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्स संघात खेळत आहे. तर गुजरात टायटन्सच्या संघात शुबमन गिल आहे. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचं नाव अनेकदा एकमेकांशी जोडलं आहे. त्यामुळे साराची ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे.
सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर, मुंबई इंडियन्सनंतर आता आयपीएल २०२६ साठी लखनौ सुपर जायंट्स संघात सामील झाला. लखनौने त्याला ट्रेडद्वारे संघात सामील केलं. मात्र, या हंगामात आतापर्यंत, या तरुण वेगवान गोलंदाजांला प्लेईंग इलेव्हनमध्ये संघात आपलं स्थान पक्क करता आलं नाही. अर्जुन नेट सरावादरम्यान दाखवून देत आहे की तो मैदानावर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. नुकतेच, एलएसजीने अर्जुनचा एकापाठोपाठ एक जबरदस्त यॉर्कर टाकतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर सर्वत्र प्रशंसा मिळत आहे.
लखनौ सुपर जायंट्सने पराभवानंतर मोहिमेची सुरूवात केल्यानंतर संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा धक्का दिल्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौने सनरायझर्स हैदराबादला ५ विकेट्सने पराभूत केलं. तर केकेआर संघावर थरारक सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. यासह लखनौ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचली आहे.
