जी. साथियान, सुतिर्था मुखर्जी आणि मनिका बात्रा हे तीन टेबल टेनिसपटू टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील कामगिरीसह आता भारताचे चार टेबल टेनिसपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानावर असलेल्या साथियानने पाकिस्तानच्या मुहम्मद रमीझचा ४-० (११-५, ११-८, ११-९, ११-२) असा पाडाव करून प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. सुतिर्थाने मनिका बात्राचा ४-२ (७-११, ११-७, ११-४, ४-११, ११-५, ११-४) असा पराभव केला. सुतिर्थाकडून पराभूत झाल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील उच्च स्थानाच्या बळावर मनिकासुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.जी. साथीयानला एका विजयाची आवश्यकता आहे.