scorecardresearch

Premium

इंडोनेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत,अग्रमानांकित जोडीवर मात, प्रणॉयचीही आगेकूच

पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणॉयनेही धक्कादायक निकाल नोंदवताना जपानच्या तिसऱ्या मानांकित कोडाई नाराओकावर २१-१८, २१-१६ असा विजय साकारला.

satwik chirag in semifinals of indonesia open
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

जकार्ता : भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रिआन आर्डिआंतो या अग्रमानांकित जोडीला पराभवाचा धक्का देत इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील (सुपर १००० दर्जा) पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयनेही लय कायम राखत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

सातव्या मानांकित सात्त्विक-चिराग जोडीने इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला. भारतीय जोडीने ४१ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१३, २१-१३ असा विजय नोंदवला. सात्त्विक-चिराग जोडीने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्यांच्या अचूक खेळाचे इंडोनेशियाच्या जोडीकडे उत्तर नव्हते. आता सात्त्विक-चिरागची कोरियाच्या कान्ग मिन ुक आणि सेव सेउंग जाये या जोडीशी गाठ पडेल.

h s pranoy
बॅडमिंटन : प्रणॉयची पदकनिश्चिती, सिंधू गारद
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित
india wins gold in horse riding
विश्लेषण: एशियाडमध्ये अश्वारोहणात ४१ वर्षांनी सोनेरी यश… ड्रेसाज हा स्पर्धा प्रकार नेमका काय आहे?
Asian Games 2023: Shooting team aims for gold India gets first gold in Asian Games by breaking China's world record
Asian Games 2023 India Gold: गोल्डन बॉईज! नेमबाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद, चीनचा विश्वविक्रम मोडून शेतकऱ्याच्या पोराने केली ऐतिहासिक कामगिरी

पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणॉयनेही धक्कादायक निकाल नोंदवताना जपानच्या तिसऱ्या मानांकित कोडाई नाराओकावर २१-१८, २१-१६ असा विजय साकारला. उपांत्य फेरीत त्याचा सामना अग्रमानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनशी होईल. सामन्यातील पहिल्या गेममध्ये नाराओकाने प्रणॉयसमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, मोक्याच्या क्षणी प्रणॉयने खेळ उंचावत विजय साकारला. दुसरा गेमही काही काळ चुरशीचा झाला. मात्र, अनुभवी प्रणॉयने संयम राखताना अखेरीस झटपट गुण मिळवत विजय संपादला.

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात किदम्बी श्रीकांतला इंडोनेशिया स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या ली शी फेंगकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. श्रीकांतने एक तास आणि नऊ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या फेंगकडून १४-२१, २१-१४, १२-२१ अशी हार पत्करली. या दोन बिगरमानांकित खेळाडूंमधील सामन्यात श्रीकांतला चुकांचा फटका बसला. फेंगच्या डावा पायाला दुखापतही झाली होती, पण याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satwik chirag hs prannoy enter indonesia open semifinals zws

First published on: 17-06-2023 at 04:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×