पीटीआय, शेन्झेन (चीन)
भारताची आघाडीची जोडी सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी एका गेमच्या पिछाडीनंतर दमदार मुसंडी मारत यजमान चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यु जोडीचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात पराभव करून चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे (सुपर ७५० दर्जा) विजेतेपद पटकावले.
सा्त्विवक-चिराग जोडीने १ तास १० मिनिटे रंगलेल्या सामन्यात चीनच्या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेत सा्त्विवक-चिराग तिसर्यांसदा अंतिम लढत खेळत होते. यापूर्वी २०२३ आणि २०२५ मध्ये भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर, थायलंड खुल्या स्पर्धेतही ते उपविजेते राहिले होते. याच महिन्यात सुरू होणार्याा आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी भारतीय जोडीला हे विजेतेपद आत्मविश्वास उंचावणारे ठरेल.
चीन संघटनेने केलेल्या सांघिक शिस्तभंगाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पुनरागमन करणार्या चीनच्या जोडीची ही तिसरीच स्पर्धा होती. भारतीय जोडीच्या विजेतेपदाचे विशेष म्हणजे या वेळी अंतिम फेरीपर्यंत त्यांना प्रत्येक सामना तीन गेमपर्यंत खेळावा लागला होता. फरक इतकाच होता की उपांत्य फेरीपर्यंत त्यांनी दुसरा गेम गमावला आणि अंतिम सामन्यात त्यांनी पहिला गेम गमावला.
भारतीय जोडीला सुरुवातील रॅलिजवर नियंत्रण मिळवता आले नाही. चीनच्या जोडीच्या वेगवान आणि आक्रमक फटक्यांचा सामना करताना त्यांना अडचणी येत होत्या. हे आणि रेन जोडीने ५-० अशा सुरुवातीनंतर आपली आघाडी ८-३ अशी वाढवली. गेमच्या मध्याला चीनची जोडी ११-५ आणि नंतर १४-७ अशी आघाडी टिकवून होती. प्रतिस्पर्धी जोडीचे जोरकस स्मॅश भारतीयांसमोर आव्हान उभे करत होते. अशातच चिरागकडून स्व्हिहसमध्ये चुका झाल्याने पहिल्या गेमला आघाडी सातत्याने चीनच्या जोडीकडेच राहिली आणि चिरागच्या अशाच एका दिशाहीन फटक्याने भारतीय जोडीला पहिला गेम सहज गमवावा लागला.
दुसर्या गेमला भारतीय जोडीने बचावात सुधारणा केली आणि रॅलिज अधिक लांबवल्या. चीनच्या जोडीला संभ्रमात टाकण्यासाठी सा्त्विवकने फ्लिक स्व्हिहसचा वापर केला. त्यामुळे चीनच्या जोडीला समोर येऊन खेळणे कठीण जाऊ लागले. यानंतरही भारतीय जोडीची आघाडी ७-६ अशीच होती. मध्यंतराला त्यांनी ११-७ अशी आघाडी वाढवली. अशा वेळी एका ४५ शॉट्सची प्रदीर्घ रॅली जिंकून भारतीय जोडीने आघाडी १२-८ वाढवली. त्यानंतर कायम पुढे राहताना सा्त्विवक-चिरागने १७-११ अशी आघाडी घेतल्यावर प्रतिस्पर्धी जोडीला केवळ दोनच गुणांची कमाई करून देत गेम जिंकला.
निर्णायक गेमला चिनी जोडीने पुन्हा लय पकडली होती.
त्यांनी ४-० अशा सुरुवातीनंतर ७-३ अशा आघाडीसह आपली बाजू भक्कम केली. मात्र, चिवट खेळ दाखवताना चिरागच्या एक अचूक स्मॅशने आणि नंतर हे जी टिंगच्या चुकीच्या फटक्यामुळे भारतीय जोडीने पिछाडी ५-७ अशी भरून काढली आणि नंतर ७-७ अशी बरोबरी साधली. गेमच्या मध्याला चीनच्या जोडीने आघाडी घेतली असली, तरी नंतर भारतीय जोडीने आघाडीतील फरक एखाद दोन गुणांचा ठेवत स्वत:ला शर्यतीत कायम राखले होते. तरी चीनची जोडी १३-१५ अशी आघाडी राखून होती. सा्त्विवकच्या एका अचूक स्व्हिहसमुळे १४-१६ अशा स्थितीनंतर भारतीय जोडीने १६-१६ अशी बरोबरी राखली. त्यानंतर वेगवान खेळायच्या नादात चीनच्या जोडीचे फटके नेटमध्ये अडकले आणि भारतीय जोडीने या संधी साधून गेमसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आता तात्कालिक उद्दिष्ट पूर्ण विश्रांती घेऊन तंदुरुस्ती शंभर टक्के राखण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आणि त्यानंतर मुख्य प्रशिक्षकांसह बसून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रणनीती आखू असे भारतीय जोडीने सांगितले.
ंआम्ही दुखापतीतून परतल्यानंतर खेळत आहोत, त्यामुळे या विजेतेपदाने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला आहे. आम्ही येण्यापूर्वी एक निश्चित रणनिती तयार केली होती. ती यशस्वी झाली तर चांगलेच, अन्यथा त्रुटींवर पुन्हा काम करण्याची आम्ही तयारी ठेवली होती. पण, आमची रणनीती कामी आली आणि आम्ही २०२६ मधील आमचे दुसरे विजेतेपद जिंकले, याचा खरोखर आनंद आहे. – सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी
ंहे खरोखरच विशेष आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेला जाण्यापूर्वी विजेतेपद जिंकल्याने नक्कीच मोठा आत्मविश्वास मिळाला. आपण ज्या गोष्टीसाठी कष्ट करत आहोत, ते योग्य दिशेने सुरू आहे, याची हे विजेतेपद म्हणजे जणू पावतीच होती. मायदेशी परतल्यावर विश्रांती घेऊन, स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊ, कसून सराव करू आणि आशियाई स्पर्धेमध्ये संपूर्ण ताकदीने उतरू. – चिराग शेट्टी
