अहमदाबाद येथे महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. सौराष्ट्रचा संघ १४ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन बनला आहे. २००७-०८ च्या मोसमात शेवटच्या वेळी संघ चॅम्पियन बनला होता. सौराष्ट्राच्या शेल्डन जॅक्सनच्या खेळीने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यावर छाया पडली. सौराष्ट्राने हा सामना पाच गडी राखून जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने ४६.३ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. हार्विक देसाई ५० आणि समर्थ व्यास १२ धावा करून बाद झाला. जय गोहिल खाते उघडू शकला नाही.

तत्पूर्वी, महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली होती. पवन शहा चार धावा करून बाद झाला. त्याचवेळी सत्यजित बाचेने २७ धावांची खेळी केली. अंकित बावणे काही विशेष करू शकला नाही आणि २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले. १३१ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १०८ धावा करून तो धावबाद झाला. विजय हजारे स्पर्धेच्या या मोसमातील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक ठरले. याआधी त्याने उपांत्य फेरीत यूपीविरुद्ध नाबाद २२० आणि आसामविरुद्ध १६८ धावांची खेळी केली होती. याशिवाय ऋतुराजने रेल्वेविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीला नाबाद १२४ धावांची खेळी केली होती.

अजीम काझी ३३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला तर सौरभ नवलेने १३ धावा केल्या. २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकाचे हिरो राजवर्धन हंगरगेकर आणि विकी ओस्तवाल यांना खातेही उघडता आले नाही. मुकेश चौधरी दोन धावा करून बाद झाला. नौशाद शेख ३१ धावा करून नाबाद राहिला. सौराष्ट्रकडून चिराग जानीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी कर्णधार जयदेव उनाडकट आणि पार्थ भुतला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा :   IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम

प्रथमच चॅम्पियन होण्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. हा संघ प्रथमच अंतिम सामना खेळत होता. त्याचवेळी सौराष्ट्र दुसऱ्यांदा ५० षटकांच्या या स्पर्धेत नाव कोरण्यासाठी उतरला होता. सौराष्ट्र संघाने अंतिम फेरीत महाराष्ट्रावर दडपण आणण्यात यश मिळवले. शेल्डन जॅक्सनच्या खेळीने ऋतुराजला सावली. सौराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले, तर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी अपवादात्मक कामगिरी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurashtra became champion for the second time defeating maharashtra by 5 wickets avw
First published on: 02-12-2022 at 17:39 IST