जयदेव उनाडकटने मंगळवारी प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. रणजी ट्रॉफीची चौथी फेरी सुरू झाली. सौराष्ट्र आणि दिल्ली संघ एका सामन्यात आमनेसामने आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि सौराष्ट्राचा कर्णधार उनाडकटने हॅट्ट्रिकसह ८ बळी घेतले. ज्यात राजकोट येथे दिल्ली विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या षटकात हॅटट्रिकचा समावेश होता. अशाप्रकारे, जयदेव उनाडकट डावाच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा रणजी ट्रॉफी इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला.

भारतीय संघाला आपली पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे. अशा स्थितीत उनाडकटची कामगिरी निवडकर्त्यांना प्रभावित करेल. तसेच कांगारू संघाची चिंता वाढवली आहे. उनाडकटला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. जिथे त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. दिल्लीविरुद्ध उनाडकटच्या या कामगिरीने निवडकर्त्यांना नक्कीच प्रभावित केले असेल.

Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Rashid Khan breaks Mohammed Shami's record
GT vs SRH : राशिद खानने शमीचा विक्रम मोडत रचला इतिहास, गुजरातसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

सौराष्ट्रच्या कर्णधाराने दिल्लीविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ध्रुव शोरे, वैभव रावल आणि यश धुल यांना सलग तीन चेंडूंवर बाद करून रणजी ट्रॉफीचा इतिहास रचला. पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उनाडकटने आतापर्यंत १२ षटकांत ३९ धावा देत ८ बळी घेतले आहेत. दिल्लीच्या पाचव्या फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. ५३ धावांवर आठ विकेट पडल्यानंतर हृतिक शोकीन आणि शिवांक वशिष्ठ यांनी डाव सांभाळला. गेल्या मोसमातील उपविजेता सौराष्ट्र या मोसमात आतापर्यंत तीन सामने खेळला असून १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Team India New Jersey: नवीन वर्षात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल; एमपीएलची माघार, आता ‘हा’ आहे नवीन किट प्रायोजक

नवव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी –

हृतिक शोकीन आणि शिवांकने नव्या विकेटसाठी ८० धावा जोडून धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. शिवांक ६८ चेंडूत ३८ धावा करून उनाडकटचा बळी ठरला. पुढच्याच चेंडूवर उनाडकटने कुलदीप यादवला शून्य धावांवर बाद करून दिल्ली संघाला बरोबरीत रोखले. ३५ षटकांत १३३ धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. विकेट पडण्याच्या दरम्यान हृतिक शोकीनने चांगली खेळी साकारली. त्याने ९० चेंडूत ६८ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले.