आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारची सुरुवात भारतासाठी ऐतिहासिक ठरली. मॅरेथॉन शर्यतीत सवान बरवालने रौप्यपदकाची कमाई केली. १९८२ नंतर म्हणजेच तब्बल ४४ वर्षानंतर मॅरेथॉन शर्यतीत भारतीय अॅथलिटने पदक पटकावण्याची किमया केली आहे. जपानच्या यामाशिताने सुवर्णपदकावर नाव कोरलं.

याआधी १९५१ मध्ये झालेल्या स्पर्धेत मॅरेथॉन शर्यतीत छोटा सिंग यांनी सुवर्णपदकावर कब्जा केला होता. भारताच्याच सुरत सिंग माथूर यांनी कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर थेट १९८२ मध्ये होसूर कुकप्पा सीथारन यांनी कांस्यपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर एवढी वर्ष भारतीय खेळाडू शर्यतीत पदकापासून वंचित राहिले होते.

पदकाचा दुष्काळ सरवान बरवालने संपवला आहे. त्याने ही शर्यत २ तास ११ मिनिटं आणि ३७ सेकंदात पूर्ण केली. शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्यपदकाची कमाई केली. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारतीय खेळाडूंची कामगिरी खालावली आहे.