scorecardresearch

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

भारताचा अनुभवी खेळाडू एच. एस. प्रणॉयने मंगळवारपासून सुरू झालेल्या सय्यद मोदी बॅडिमटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पीटीआय, लखनऊ

भारताचा अनुभवी खेळाडू एच. एस. प्रणॉयने मंगळवारपासून सुरू झालेल्या सय्यद मोदी बॅडिमटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित समीर वर्माला पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामन्यातून माघार घ्यावी लागली. पुरुष एकेरीतील सलामीच्या लढतीत पाचव्या मानांकित प्रणॉयने युक्रेनच्या डॅन्यलो बोस्नियुकचा २१-१४, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. प्रणॉयने अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली असून मागील आठवडय़ात इंडिया खुल्या स्पर्धेची त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता त्याचा दुसऱ्या फेरीत भारताच्याच प्रियांशू राजावतशी सामना होईल. शुभांकर डेलाही कार्तिकेय गुलशन कुमारविरुद्धचा सामना मध्यात सोडावा लागला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर असताना त्याने हार पत्करली.

महिलांमध्ये अश्मिता चालिहाला मालविका बनसोडविरुद्ध पुढे चाल मिळाली. आकर्षि कश्यपने मुग्धा आग्रेला २१-१३, २१-१४ असे पराभूत केले. अनुपमा उपाध्यायने रितुपर्णा दासवर २१-७, २१-१० अशी मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sayyed modi badminton tournament pranoy enters second round ysh

ताज्या बातम्या