वेटेलला बेल्जियम शर्यतीचे जेतेपद

रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करीत बेल्जियम ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत जेतेपदावर कब्जा केला.

रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करीत बेल्जियम ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत जेतेपदावर कब्जा केला. या कामगिरीसह विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत वेटेलने अग्रस्थानाची आघाडी मजबूत केली.
२६ वर्षीय वेटेलने पहिल्याच लॅपमध्ये पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या लुइस हॅमिल्टनला मागे टाकले. त्यानंतर कारवर अचूक नियंत्रण साधत त्याने या मोसमातील पाचवे, तर कारकिर्दीतील ३१ वे जेतेपद प्राप्त केले. दुसऱ्या क्रमांकावरील फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोला १६.८६९ सेकंदाने सहजपणे मागे टाकत वेटेलने जेतेपद मिळवले.
मर्सिडिझच्या हॅमिल्टनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हॅमिल्टनचा मर्सिडिझचा सहकारी निको रोसबर्ग चौथा आला. रेड बुलच्या मार्क वेबरने पाचवे, तर मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनने सहावे स्थान प्राप्त केले. फेरारीचा फेलिपे मासा सातवा, तर लोटसचा रोमेन ग्रॉसजेन आठवा आला. सहारा फोर्स इंडियाचा ड्रायव्हर एड्रियन सुटीलने सुरेख कामगिरी करत नवव्या क्रमांकावर मजल मारली. टोरो रोस्सोच्या डॅनियल रिकाडरेने दहावे स्थान पटकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sebastian vettel wins f1s belgian grand prix to strengthen title hold