वेटेल अजिंक्य

रेड बुल संघाच्या सिबॅस्टिन वेटेलने दमदार वर्चस्वासह इटालियन ग्रां.प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या विजयासह वेटेलने

रेड बुल संघाच्या सिबॅस्टिन वेटेलने दमदार वर्चस्वासह इटालियन ग्रां.प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या विजयासह वेटेलने ड्रायव्हर्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५० गुणांची भक्कम आघाडी घेतली आहे. जर्मनीच्या २६ वर्षीय गटविजेता आणि तीनवेळा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरलेल्या वेटेलने खराब सुरुवात आणि गिअरबॉक्समध्ये उद्भवलेली समस्या यांना बाजूला सारत अव्वल स्थानी कब्जा केला.
फेरारीचा शर्यतपटू फर्नाडो अलोन्सोला केवळ ५.४ सेकदांनी मागे टाकत वेटेलने आगेकूच केली. रेड बुल संघाच्या आणि वेटेलचा संघसहकारी असलेल्या मार्क वेबरने तिसरे स्थान पटकावले.
उष्ण हवामान आणि ढगाळलेल्या वातावरणात गाडय़ांची सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला रेड बुलच्या शर्यतपटूंना संघव्यवस्थापनाने दिला होता. हा सल्ला पाळत वेटेलने शैली आणि परिस्थितीशी संघर्ष करत हंगामातील सहावे तर कारकिर्दीतील ३२व्या जेतेपदावर नाव कोरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sebastian vettel wins italian grand prix extends championship lead