scorecardresearch

जोकोव्हिच अखेर माघारी; व्हिसा रद्द न करण्याची विनंती ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने फेटाळली

ऑस्ट्रेलिया सरकारच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जोकोव्हिचने न्यायालयात दाद मागितली होती

व्हिसा रद्द न करण्याची विनंती ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने फेटाळली

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचबाबत जवळपास दोन आठवडे चाललेल्या नाट्यावर अखेर रविवारी पडदा पडला. ऑस्ट्रेलिया सरकारच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जोकोव्हिचने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, केंद्रीय न्यायालयाने जोकोव्हिचचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियातून परत पाठवणी झाली.

करोना लस न घेता केवळ वैद्यकीय सवलतीच्या आधारे मेलबर्न येथे दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे परदेशी नागरिकविषयक खात्याचे मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांनी विशेष अधिकार वापरून शुक्रवारी रद्द केला. त्यांच्या या निर्णयाला जोकोव्हिचने न्यायालयात आव्हान दिले.

या प्रकरणावर रविवारी झालेल्या सुनावणीत केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने जोकोव्हिचच्या विरोधात निकाल दिला.

विक्रमाची संधी हुकली

केंद्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे जोकोव्हिचला सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता येणार नाही. तब्बल नऊ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोव्हिचला यंदा २१ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती.

माझा अर्ज फेटाळण्यात आला; न्यायालयाच्या या निर्णयाने मी प्रचंड निराश झालो आहे.  – जोकोव्हिच

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Serbian tennis player novak djokovic australian government visa revoked central court akp

ताज्या बातम्या