scorecardresearch

Premium

PAK vs AUS: हैदराबादी बिर्याणीमुळे बिघडली पाकिस्तानची फिल्डिंग! पराभवानंतर शादाब खानने केला खुलासा, पाहा VIDEO

Shadab Khan Video Viral: मंगळवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १४ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यानंतर शादाब खानने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pakistan Vs Australia Practice Match Updates
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर शादाब खानने केला खुलासा

Shadab Khan Says we are eating Biryani every day and probably getting a little bit slow: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला आहे. पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये थांबला आहे. इथेच पाकिस्तानचे दोन्ही सराव सामने झाले. या दोन्ही सराव सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. येथेच हा संघ विश्वचषकातील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. यादरम्यान पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने संथ क्षेत्ररक्षणासाठी हैदराबादी बिर्याणीला जबाबदार धरले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा पहिला सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला होता, या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला. या दुसऱ्याही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर हर्षा भोगलेने शादाब खानला हैदराबादी बिर्याणीबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, तो आणि त्याची टीम भरपूर बिर्याणी खात आहेत. कदाचित त्यामुळेच खेळाडू मंदावली आहेत.

Pakistan team trolls on social media:
Shikhar Dhawan: टीम इंडियाच्या गब्बरने पाकिस्तानची उडवली खिल्ली, खराब क्षेत्ररणाचा VIDEO होतोय व्हायरल
BCCI to refund ticket money to fan
BCCI: विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सराव सामन्यात चाहत्यांना का मिळणार नाही प्रवेश? जाणून घ्या कारण
Pakistan vs Sri Lanka, Asia Cup 2023 Match Updates
PAK vs SL: पाकिस्तानचा पत्ता कट! फायनल भारत वि. श्रीलंका
Shoaik Akhtar Says I got Call India Fixed Match At Asia Cup Super 4 Match Praise Kuldeep Yadav Bumrah to Throw Out Pakistan
“भारताने मॅच फिक्स केल्याचे कॉल येतायत..”, शोएब अख्तरचा Video तुन मोठा खुलासा; म्हणाला, “पाकिस्तानला बाहेर…”

हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सात वर्षांत पाकिस्तानी संघाचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पाक संघ गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे. हैदराबादमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यामुळे तो खूप खूश आहे. टीमने टीम डिनरचा आनंदही घेतला आणि चाहत्यांसोबत सेल्फीही घेतले.

हेही वाचा – Shikhar Dhawan: टीम इंडियाच्या गब्बरने पाकिस्तानची उडवली खिल्ली, खराब क्षेत्ररणाचा VIDEO होतोय व्हायरल

दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून १४ धावांनी पराभव झाला. सामन्यानंतर, लोकप्रिय भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी शादाब खानला प्रसिद्ध हैदराबादी बिर्याणीबद्दल विचारले, तेव्हा पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने मजेदार उत्तर दिले. तो हसत म्हणाला, “आम्ही ते रोज खात आहोत आणि कदाचित म्हणूनच आम्ही थोडे स्लो झालो आहोत.” स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी हैदराबादमध्ये पाकिस्तानचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

खराब क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानचा संघ होतोय ट्रोल –

पाकिस्तान संघ हा सामना हरला. पण सामन्यादरम्यान त्याची क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेष्टेचे ठरले. विश्वचषकापूर्वी त्यांचे क्षेत्ररक्षण पाहून चाहते संघाची खिल्ली उडवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डावातील २३व्या षटकातील हारिस रौफच्या पहिल्याच चेंडूवर मार्नस लाबुशेनने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळला. दुसरीकडे, थर्ड मॅनच्या बाजूने मोहम्मद वसीम ज्युनियर आणि डीप स्क्वेअर लेगमधून मोहम्मद नवाज चेंडू रोखण्यासाठी धावले, पण समोरून येणारा वसीमची धडक टाळण्याच्या प्रयत्नात नवाज चेंडू रोखण्यासाठी वाकला नाही. त्यामुळे चेंडू रेषेच्या बाहेर गेला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shadab khan says we are eating biryani every day and probably getting a little bit slow because of that vbm

First published on: 04-10-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×