दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी भारताची सलामीची फलंदाज शफाली वर्माला नामांकन मिळाले आहे. तिच्यासमोर संयुक्त अरब अमिरातीची ईशा ओझा आणि थायलंडची थिपाटचा पुथ्थवॉन्गचे आव्हान असेल.
प्रतिका रावल जायबंदी झाल्यानंतर शफालीला महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम लढतीत तिने फलंदाजीत ८७ धावा आणि गोलंदाजीत दोन बळी, अशी दुहेरी कामगिरी करत भारताच्या ऐतिहासिक जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तीच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराची मानकरी ठरली होती.
पुरुषांमध्ये या पुरस्कारासाठी दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिनर सायमन हार्मर, बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लाम आणि पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नवाझ यांच्यात स्पर्धा असेल. हार्मरने अलीकडेच झालेल्या भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १७ बळी मिळवले होते.
